लोकसत्ता टीम
वर्धा : नॅशनल टेस्टिंग एजेन्सीने यूजीसी राष्ट्रीय पात्रता चाचणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा ६ ते १४ डिसेंबर या कालावधीत ऑनलाईन होणार आहे. परीक्षेसाठी निश्चित केलेल्या शहरांची यादी परीक्षेच्या दहा दिवस आधी जाहीर केल्या जाणार आहे. एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावर ती उपलब्ध होणार.
आणखी वाचा-मराठा आरक्षण : न्यायमूर्ती संदीप शिंदे विदर्भात येणार, असा आहे कार्यक्रम
सहा डिसेंबरला दोन सत्रात परीक्षा होणार. पहिल्या सत्रात इंग्रजी, हिंदू स्टडीज, कोकणी व इतर काही परकीय भाषांची परीक्षा घेतल्या जाईल.दुसऱ्या सत्रात इतिहास, मणिपुरी, जर्मन, सिंधी या विषयांच्या होतील.त्यापुढे रोज दोन सत्रात विविध विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहे.यापूर्वी जून २०२३ मध्ये ही परीक्षा झाली होती.अद्यावत माहितीसाठी संकेतस्थळावर भेट देण्याची सूचना आहे.