नागपूर : ॲड. उज्ज्वल निकम यांनी मुंबई दहशवादी हल्ला प्रकरणी न्यायालयात जे पुरावे सादर करायला हवे ते सादर केले नाही, असा दावा करून महत्वाचे पुरावे सादर न करणारे निकम हे देशद्रोही असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.
वडेट्टीवार गुरुवारी त्यांच्या नागपूर निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ॲड. निकम यांना उत्तर-मध्य मुंबईतून भाजपने उमेदवारी दिल्यानंतर मुंबई हल्ला प्रकरण चर्चेत आले आहे. त्यावरून आरोपप्रत्यारोप होत आहेत. यासंदर्भात वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले, पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांचा खून दहशतवादी कसाबच्या बंदुकीने झाला नव्हता. ती गोळी संघाशी (आरएसएस) संबंधित एका पोलीस अधिकाऱ्याची होती. निकम यांनी हे सत्य न्यायालयापासून लपवून ठेवले, अशा देशद्रोह्याला भाजपने उमेदवारी दिली आहे.
हेही वाचा – युवक काँग्रेसमध्ये कारणे दाखवा नोटीसमुळे वादळ, कुणाल राऊत लक्ष्य
हेही वाचा – केंद्र सरकारच्या दबावामुळे तर मतदानाचा टक्का वाढला नाही ना ? अनिल देशमुख यांचा सवाल
दहशतवादी कसाबने बिर्याणीची मागणी केली अशी खोटी माहिती ॲड. निकम यांनी प्रसारित करून विषयाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला. कसाबला बदनाम करण्यासाठी असे विधान केल्याचे नंतर निकम यांनी मान्य देखील केले, असा दावाही वडेट्टीवार यांनी केला.