नागपूर: आजारपण किंवा अपघातात उपचारासाठी मानवा प्रमाणे गायी, म्हैस व तत्सम पाळीव प्राण्यांचे एक्स रे काढण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीची मशीन तयार करण्यात आली आहे. त्याद्वारे विदर्भात नांदुरा येथील गोकुल गौरक्षण संस्था व विदर्भातील विविध गोरक्षणच्या पशुचिकित्सालयात एक्सरे काढले जातात.
जनावरांच्या पोटात काय हे एक्सरे मशीनद्वारे पाहिले जाते. असे महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे सदस्य डॉ. सुनील सूर्यवंशी यांनी सांगितले. रामटेकजवळील देवलापार येथे या पद्धतीची व्यवस्था केली जाणार आहे. आतापर्यंत गोकुलम गौरक्षण संस्थेत ३१ हजार ५८६ गोवंशावर उपचार करण्यात आले आहे.