चंद्रपूर: जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पाऊसाने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने नागभीड – उमरेड- नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ वाहतुकीसाठी बंद आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर प्रथमच जिल्ह्यात शनिवारी रात्री तथा रविवारी पहाटे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यातील अनेक नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. वैनगंगा,  वर्धा, अंधारी, इरई, पैनगंगा तथा अन्य नद्याना पाणी आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सर्वाधिक पाऊस हा सावली तालुक्यात १४३.५ मी.मी. तर नागभीड तालुक्यात १२३.६ मी.मी. झाला आहे. सततच्या पावसामुळे या तालुक्यातील अनेक मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत. नागभीड एमआयडीसी जवळील बामणी पुलावर पाणी चढल्याने पहाटेपासुनच या मार्गावरील वाहतुकीसाठी बंद आहे. नागभीड – उमरेड- नागपुर राष्ट्रीय महामार्ग क्र. २५३ या मार्गावरील वाहतूक पहाटेपासून बंद आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली आहे. ग्रामीण भागात रस्त्यावर देखील पाणी साचले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Umred nagpur national highway closed due to heavy rain in chandrapur district rsj 74 ysh