संपामुळे दुरुस्तीला अडचण

नागपूर: उपमुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जिल्यातील उमरेड, भिवापूर परिसरात मंगळवारी रात्री अवेळी पाऊस पडला. त्याचा फटक्याने येथील बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित झाला आहे. येथील ९७ टक्के कर्मचारी संपात असल्याने वीज पुरवठा सुरळीत करण्यास अडचण येत आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाला नागपूर जिल्ह्यातही चांगला प्रतिसाद आहे. महावितरणचेही कर्मचारी- अधिकारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

MSEB Employee Strike: उपमुख्यमंत्र्यांच्या विभागात संपाला सर्वाधिक प्रतिसाद, तब्बल ९० टक्के कर्मचारी संपावर

महावितरणच्या माहितीनुसार, मध्यरात्री कर्मचाऱ्यांची संख्या कमी असते. त्यानंतरही कर्मचारी- अधिकाऱ्यांच्या तुलनेत शहरात सुमारे ९० टक्के तर ग्रामीण भागात ९६ टक्के कर्मचारी संपात होते. दरम्यान ग्रामीणच्या बऱ्याच भागात पाऊस पडला. त्यामुळे उमरेड, भिवापूरच्या बऱ्याच भागात वीज पुरवठा खंडित झाला. ही माहिती कळताच कमी संख्या असली तरी वरिष्ठ अधिकारी काही बाह्यस्रोत कर्मचार्यांसह दुरुस्तीच्या कामात लागले आहे. परंतु कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने आणि नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत नवखे कर्मचारी दुरुस्ती करत असल्याने वीज पुरवठा सुरळीत व्हायला वेळ लागत आहे. परंतु महावितरणचे अधिकारी तातडीने बहुतांश भागातील दुरुस्ती झाल्याचे सांगत स्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आहेत.