नागपूर : राज्यातील वाढती बेरोजगारी आणि स्वयंरोजगारासाठी आवश्यक भांडवल याअभावी अनेक युवक रेल्वेस्थानक परिसरात आणि रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ, पाणी बाटली तसेच सिगारेट, गुटखा व तत्सम पदार्थ अनधिकृतपणे विक्री करू लागले आहेत. त्यामुळे रेल्वे शयनयान डब्यातील प्रवासात सिगारेट, गुटखा, खाद्यपदार्थ व इतर वस्तू विक्रेत्यांचा त्रास वाढला असून प्रवाशांच्या तक्रारीनंतर रेल्वे सुरक्षा दलाने राबलेल्या मोहिमेत गेल्या वर्षभरात तीन हजार ६९३ अशा विक्रेत्यांना अटक केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांना पाणी आणि खाद्यपदार्थ पुरवण्यासाठी रेल्वेची यंत्रणा आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोशन (आयआरसीटीसी) तर्फे ही सेवा दिली जाते. याशिवाय विभागीय पातळीवर खाद्यपदार्थ विक्रीसाठी परवाने दिले जातात. रेल्वेत विडी, सिगारेट, गुटखा, गांजा यासारखे पदार्थ विकण्यास बंदी आहे. पण, हे पदार्थ रेल्वेगाड्यांमध्ये छुप्या पद्धतीने मिळत असल्याचे दिसून येत आहे. यासाठी बेरोजगारी हे प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञाचे मत आहे. महाराष्ट्र सरकारच्या २०२२-२३ च्या आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवालातील तपशीलानुसार राज्यात पदविका आणि पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या युवकांमध्ये सर्वांधिक म्हणजे १० ते १२ टक्के आहे. राज्यात २०१८-१९ मध्ये ग्रामीणमध्ये ४.२ टक्के, शहरी भागात ६.३ टक्के आणि २०२०-२१ मध्ये मध्ये ग्रामीण भागात २.२ टक्के आणि ६.५ टक्के बेरोजगारीचा दर होता.

हेही वाचा >>>मनसे जिल्हाध्यक्षासह चार पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल; व्यापाऱ्याकडे मागितली २ लाखांची खंडणी

दरम्यान, प्रवाशांना लांब पल्ल्याच्या प्रवासात खाद्यपदार्थ, पाणी याची गरज भासते. त्याची आयआरसीटीसीकडून व्यवस्था असते. परंतु अनेक रेल्वेगाड्यांमध्ये विशेषत: शयनयान आणि सर्वसाधारण डब्यात विडी, सिगारेट, गुटखा, पाणी बाटली, भेळ, फळ व इतर खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. हे विक्रेते अनधिकृत असतात. पण, रेल्वेत पुरेसे तिकीट तपासणीस (टीटीई) आणि रेल्वे सुरक्षा दलाकडे उपलब्ध नसल्याने शयनयान डब्यात अनधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांची गर्दी वाढली आहे. यासंदर्भात अनेकदा तक्रारी देखील करण्यात आल्या. त्याची दखल घेत रेल्वे सुरक्षा दल अधून-मधून विशेष मोहीम राबवून बेकायदेशीर विक्रेत्यांच्या बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, कारवाई होऊन काही दिवस होताच पुन्हा विक्रेते रेल्वेगाड्यांमध्ये खाद्यपदार्थ आणि वस्तू विक्री करतात. यामुळे प्रवाशांना सिगारेट, विडीचा त्रास तर होतो त्याचसोबत डब्यात आगीच्या घटना घडण्याचा धोका देखील निर्माण होत आहे, असे रेल्वे प्रवासी अश्विनी तरारे म्हणाल्या.

रेल्वे सुरक्षा दलाने अनधिकृत खाद्यपदार्थ, पाणी, गुटखा, सिगारेट, फळ व इतर वस्तू विक्रेत्यांवर २०२२ मध्ये २०७५ प्रकरणे नोंदवली गेली. त्यापैकी २०७४ विक्रेत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २३ लाख तीन हजार २५० रुपये दंड वसूल करण्यात आले. रेल्वेगाड्यांमध्ये २०२३ मध्ये अनधिकृत विक्रेत्यांची संख्या वाढली. या वर्षांत ३६९३ तक्रारी नोंदवण्यात आल्या. त्यातील सर्व अनधिकृत विक्रेत्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ३८ लाख २५ हजार ९५५ रुपये दंड वसूल करण्यात आले, असे मध्य रेल्वेचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त मनोज सिंह यांनी सांगितले.