लोकसत्ता टीम
नागपूर: जिल्ह्यात सरोगसी कायदा २०२१ ची प्रभावी अंमलबजावणी करत अनधिकृत सरोगसीला आळा घालण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा वैद्यकिय मंडळाची पहिली बैठक पार पडली.
नागपूर जिल्ह्यामध्ये कुठेही अनधिकृत सरोगसी होऊ नये यासाठी जिल्ह्यातील सर्व रुग्णालय संचालकांनी जिल्हा वैद्यकीय मंडळाकडून इसेंनसीयालिटी सर्टिफिकेट, इलिजीबिलीटी सर्टिफिकेट प्राप्त करुन घेतल्यावरच पुढील प्रक्रिया करावी तसेच जे रुग्णालय सरोगसी व असीस्टेड रिप्रॉडक्टीव्ह टेक्नोलॉजी अंतर्गत आर्ट बँक, आर्ट क्लिनिक, आर्ट क्लिनिक लेवल-२ नोंदणीकृत नाही त्यांनी शासनाचे http://www.registry.artsurrogacy.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन अर्ज भरून जिल्हा शल्यचिकित्सक, नागपूर या कार्यालयास अर्ज सादर करावा, असे आवाहन यावेळी डॉ. निवृत्ती राठोड यांनी या बैठकीत केले.
सरोगसी कायदा-२०२१च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या कायद्याच्या कलम ०४ (ए) (i) अंतर्गत शासनाने जिल्हा वैद्यकिय मंडळची स्थापना केली आहे.