नागपूर : शेजारी राहणाऱ्या दारुड्या मामाची १७ वर्षीय भाचीवर वाईट नजर पडली. त्याने घरी कुणी नसल्याचा गैरफायदा घेत भाचीला घरात ओढून शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपी मामावर गुन्हा दाखल केला असून अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १७ वर्षीय मुलीचे आईवडील मोलमजुरी करतात. तिला लहान बहीण आणि भाऊ आहे. तिच्या शेजारी आरोपी द्वारकेश (३५) नावाचा मामा राहतो. त्याला दारूचे व्यसन आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून त्याची भाचीवर वाईट नजर होती. तो तिच्या घरी जाऊन तिचा लाड करण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील चाळे करीत होती. तिने सुरवातीला मामा असल्यामुळे दुर्लक्ष केले. तिचे आईवडील घरी नसताना तो वारंवार घरी यायला लागला. त्याने तिला भेटवस्तू, चिप्स किंवा चॉकलेट देऊन जाळ्यात ओढण्याचे प्रयत्न केले.

principal suspended for negligence in duty in midday meal food poisoning case pmd
वर्धा : कर्तव्यात कसुर; मुख्याध्यापक निलंबित; शालेय पोषण आहार विषबाधा प्रकरण
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
The Nagpur Bench of Bombay High Court ruled on girls entitlement to maintenance
अविवाहित मुलीला वडिलांकडून पोटगी मिळू शकते? न्यायालयाने दिला ‘हा’ निर्णय….
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
school girl and her brother molested by minors who threatened to kill her
जिवे मारण्याची धमकी देऊन शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य, अल्पवयीनांविरुद्ध गुन्हा दाखल

हेही वाचा – वर्धा : ओबीसी मुलींसाठी पहिले शासकीय वसतिगृह नाशकात; १ मार्चपासून अर्ज करता येणार

हेही वाचा – नागपूर : फिजिओथेरापीस्टकडे उपचार घेताना ‘ तो’ पडला प्रेमात आणि केले अश्लील चाळे

२० फेब्रुवारीला सकाळी साडेअकरा वाजात तिचे आई-वडील घरी नव्हते. ती एकटी घरी असल्याचे बघून मामाने तिचे घर गाठले. आतमध्ये गेल्यावर त्याने तिला कवेत पकडले आणि शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. त्यामुळे त्याने तिच्याशी बळजबरी करीत अश्लील चाळे केले. घडलेल्या प्रकाराबाबत कुणालाही न सांगण्याची धमकी दिली. चार दिवसांनंतर मामाने तोच प्रकार करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे तिने आईला मामाच्या अश्लील कृत्याबाबत कल्पना दिली. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून अटक केली.

Story img Loader