भंडारा : सावरगाव येथून कडधान्य घेऊन लाखांदूरकडे येत असलेला ट्रॅक्टर पुलावर अनियंत्रित होऊन थेट तीस फूट खोल चुलबंद नदीपात्रात कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू, तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज गुरुवारी २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजतादरम्यान घडली. अण्णा रामचंद्र पारधी (५०) असे मृताचे नाव असून, राधेश्याम मधुकर ढोरे (२३) व राष्ट्रपाल सावजी ठाकरे ( ५०) हे गंभीर जखमी असून, तिघेही सावरगाव येथील रहिवासी आहेत.

प्राप्त माहितीनुसार, ट्रॅक्टर सावरगाववरून कडधान्य घेऊन लाखांदूर येथे येण्यासाठी निघाला असता लाखांदूर येथील चुलबंद नदीच्या पुलावर येताच मागून भरधाव वेगाने टिप्पर आल्याने चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटले. यातच ट्रॅक्टरच्या दोन्ही मोठ्या चाकांना कॅचबिल लावले असल्याने टिप्परसोबत धडक तर होणार नाही या भीतीने ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर बाजूला घेण्याचा प्रयत्नात असतानाच भरधाव वेगात असलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह पुलाचे तीन लोखंडी कठडे तोडून ३० फूट खोल चुलबंद नदीत कोसळले.

BJP workers request party seniors that Abdul Sattar should not be minister again
काहीही करा पण मंत्रीपदी सत्तार नको, भाजप कार्यकर्त्यांचे साकडे
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
BJP leaders vikasrao dube son amol dube kidnapped from Parli ransom of Rs 2 crore demanded
परळीतून भाजप नेत्याच्या मुलाचे अपहरण; दोन कोटींच्या खंडणीची मागणी
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
diarrhea, Badlapur, girl died diarrhea Badlapur,
अतिसाराने चिमुकलीचा मृत्यू, बदलापुरातील दुर्दैवी घटना, अंधश्रद्धेचा संशय
badlapur accident latest news in marathi
बेदरकार ट्रकने चिरडल्याने एकाचा मृत्यू; बदलापूर येथील घटना, चालक ताब्यात
Nitin Gadkari on road safety
Nitin Gadkari : “माझा पाय चार ठिकाणी मोडला होता…” विरोधीपक्षनेते असताना गडकरींसोबत काय घडलं होतं? गडकरी म्हणाले, “लोकांना…”

हेही वाचा – ‘कोणी घर देता का घर..’ राज्यात पाच लाख घरकूल बांधणीचे काम शिल्लक

हेही वाचा – नागपूर मेडिकलच्या अनुदानात वाढ; तरीही पायपीट..

घटनास्थळावरून अपघातग्रस्ताचे गाव अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असल्याने अपघाताची माहिती मिळताच असंख्य नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. लाखांदूर ग्रामीण रुग्णालयात माहिती देऊन पोलिसांनी रुग्णवाहिका बोलावली व त्यात तिघांनाही तात्काळ लाखांदूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र यात उपचारादरम्यान अण्णा रामचंद्र पारधी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले, तर अन्य दोनजण गंभीररित्या जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. यातील राधेश्याम ढोरे यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या चुलबंद नदीवरील पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. बांबूचा जुगाड तोडून ट्रॅक्टर खाली कोसळल्याने ट्रॅक्टरला मोठे नुकसान झाले आहे. लाखांदूर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप ताराम यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Story img Loader