चंद्रपूर: राष्ट्रीय शुद्ध हवा कार्यक्रमांतर्गत शहरात इंधनविरहित पर्यावरणपूरक वाहतूक व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने चंद्रपूर महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शहरात सायकल चालविण्यास प्रोत्साहन मिळावे व नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करावा, यासाठी शहरात राजीव गांधी उद्यान येथे १०० रुपयात ‘ शेअरिंग सायकल ‘ (सार्वजनिक सायकल सुविधा) हा उपक्रम सुरू केला. या उपक्रमाचा शुभारंभ आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या उपक्रमाअंतर्गत २० सायकल उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. राजीव गांधी उद्यान पठाणपुरा येथे नोंदणी व मासिक शुल्क भरून नागरिकांना भाडेतत्त्वावर सायकलींचा वापर करता येणार आहे. यासाठी अगदी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असून केवळ १०० रुपयात महिनाभर सायकल चालविता येणार आहे.

हेही वाचा… मुलाच्या चतुराईने पित्याचे अनैतिक संबंध उघड; अखेर पोलिसांनी समुपदेशाने दोन्ही कुटुंबाची गाडी आणली रुळावर

शहरात वाहनांची गर्दी होत असताना अनेक गरजुंना वाहतुकीची साधने उपलब्ध नाहीत किंबहुना ते घेऊ शकत नाही. अशावेळी इतर सार्वजनिक वाहतुकींच्या साधनांचा वापर करण्याऐवजी सायकल हा कुठल्याही प्रकारचे वायू प्रदूषण न करणारा सोपा पर्याय आहे. तसेच माफक शुल्कात उपलब्ध असल्याने सहज वापरण्याजोगा आहे. बाईक प्रेमी तरुणाईत सायकलप्रेम जागविण्याचा दृष्टीने महापालिकेतर्फे सायकल शेअरिंग प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आले आहे.