यवतमाळ : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हे यवतमाळकरांच्या जीवावर उठल्याचे आज, शनिवारी सकाळी पुन्हा एकदा सिद्ध झाले. आज सकाळी येथील माईंदे चौक ते अँग्लो हिंदी हायस्कूल मार्गावर घडलेल्या घटनेने अनेकांच्या काळजाचा थरकाप उडाला. पाण्याच्या प्रचंड दबावामुळे भूमिगत पाईपलाईन फुटल्याने जमीन अक्षरक्ष: वर उडाली. यात एक वाहनधारक तरुणी जखमी झाली.

हेही वाचा >>> अमरावती : शहर बससेवा बंद असल्‍याने प्रवाशांचे हाल; वाहतूकदार कंपनीचे कंत्राट रद्द

Terrorism started by gangs in Pune crime news Pune news
निवडणुकीच्या तोंडावर शहरात टोळक्याकडून दहशतीचे प्रकार – वारजे, पर्वती, चंदननगर पाेलीस ठाण्यात गुन्हे दाखल
27th Rashibhavishya In Marathi Horoscope Today
27 October Horoscope : अचानक धनलाभ ते‌ वैवाहिक…
man hit his father on head with an iron rod after arguments in amravati
अमरावती : रागातून उद्भवला वाद; मुलाने लोखंडी बत्त्याने वडिलांच्या डोक्यावर…
Tragic! Youth Dies After Falling From 3rd Floor While Filming Slow Motion Reel In UP's Agra
“एक चूक आई-वडिलांना कायमचं दु:ख देऊन जाईल” रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; तरुणाच्या मृत्यूचा VIDEO पाहून थरकाप उडेल
College youth drowned Khamboli lake, Khamboli lake, Mulshi,
मुळशीतील खांबोली तलावात बुडून महाविद्यालयीन तरुणांचा मृत्यू
Delhi Blast Near CRPF School pti
दिल्लीतल्या स्फोटाचं कारण काय? घटनास्थळावरील ‘पांढऱ्या पावडर’मुळे फॉरेन्सिक टीम चकीत; दहशतवादी कटाचा संशय?
Youth murder Amravati, Amravati Crime news,
अमरावती : युवकाची हत्‍या अन् संतप्‍त नागरिकांचा पोलीस ठाण्‍यासमोर ठिय्या
youth body in box Hadapsar, Hadapsar,
पुणे : हडपसर भागात खोक्यात तरुणाचा मृतदेह सापडला, तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू

‘अमृत’ पाणी पुरवठा योजनेचे भिजतघोंगडे गेल्या पाच वर्षांपासून सुरू असताना या योजनेच्या कामामुळे शहरात काही लोकांचा बळी गेला तर अनेकजन जायबंदी झाले. मात्र आज सकाळी चापडोह पाणीपुरवठा योजनेची जीर्ण झालेली पाईपलाईन अनपेक्षितपणे फुटली. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून जमिनीतून मोठा स्फोट होऊन पाणी वर उडाल्याचे त्यात दिसते. पाईलपलाईन फुटली त्यावेळी तेथून एक तरुणी दुचाकीवर जात होती. ती या घटनेत जखमी झाल्याची माहिती आहे. पाईपमध्ये साचलेले शेकडो लिटर पाणी रस्त्यावर आल्याने हा संपूर्ण परिसर जलमय झाला.  या घटनेमुळे शहरात कधीही मोठी दुर्घटना होऊ शकते, याचे प्रत्यंतर आले.

अँग्लो हिंदी हायस्कूल नजीक मजिप्राचे कार्यालय आहे. येथे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन मोठ्या पाण्याच्या टाक्या आहेत. या टाकीत चापडोह धरणातून आलेले पाणी पोहचविण्यासाठी जुनी पाईपलाईन आहे. शहरात निळोणा धरणातून पाणी पुरवठा करण्यासाठी १९७२ पाईपलाईन टाकण्यात आली होती. कालांतराने याच पाईपलाईनद्वारे चापडोह धरणातील पाणीपुरवठा होत होता. चार वर्षांपूर्वी शहरात अमृत पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू झाले. या योजनेंतर्गत संपूर्ण शहरात नवीन पण निकृष्ट, अशी पाईपलाईन टाकण्यात आली. आज तीच पाईपलाईन फुटली असावी, अशी शंका व्यक्त होत होती. मात्र आज फुटलेला पाईप चापडोह पाणी पुरवठा योजनेचा होता. त्यातून शहराला पाणीपुरवठा होत नव्हता, मात्र त्या पाईपमध्ये पाणी भरून होते. अत्यंत जीर्ण झाल्यामुळे पाईपलाईनमधील पाण्याच्या दबावाने, जमीनीला फोडून पाणी वर आले, अशी माहिती मजिप्राचे अभियंता प्रफुल्ल व्यवहारे यांनी दिली. या पाईपलाईन दुरूस्तीचे काम सुरू असून भविष्यात ही सर्व पाईपलाईन काढून टाकण्यात येईल, असे व्यवहारे यांनी सांगितले. प्रशासनाने दखल घेऊन मजिप्राचा कारभार सुधारण्यासाठी निर्देश देण्याची मागणी यावेळी नागरिकांनी केली.