कुख्यात गुंड अरूण गवळी याने पुन्हा एकदा पॅरोलसाठी अर्ज केला आहे. पत्नी आशा गवळी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्यामुळे आपल्याला ३० दिवसांचा पॅरोल मिळावा अशी मागणी त्याने अर्जात केली आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयाने मुंबई पोलीस, तुरूंग प्रशासन व विभागीय आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.
शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने २०१२ मध्ये अरुण गवळीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सध्या तो नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगतोय. यापूर्वीही मे २०१५ मध्ये गवळी आपला मुलगा महेश याच्या लग्नाकरता १५ दिवसांच्या पॅरोलवर तुरूंगाबाहेर आला होता. त्यावेळी मुंबई पोलीसांनी  शांततेचा भंग होईल म्हणून पॅरोलवर आक्षेप घेतला होता. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी पॅरोलचा अर्ज नाकारल्याने गवळीने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अपिल केले होते. नागपूर खंडपीठाने १५ दिवसांची रजा मंजूर केली होती.