चंद्रपूर : देशात दोन कोटी रोजगार निर्मितीचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले होते. मात्र, रोजगार निर्मिती कमी तर बेरोजगारीचा स्फोट होताना दिसून येत आहे. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यात दरवर्षी दीड लाख तरुण बेरोजगारांची नोंदणी होत आहे. तीन वर्षांत ४ लाख ३१ हजार ९०४ बेरोजगारांची नोंदणी झाली असून केवळ २ हजार ४७६ जणांनाच नोकरी मिळाल्याचे आकडेवारीवरून उघडकीस आले आहे. बेरोजगारीचा आकडा दिवसागणिक वाढतच चालला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बेरोजगारी कमी होत असल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात बेरोजगारीचा स्फोट होत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. बेरोजगारांची नोंदणी व नोंदणी झालेल्या बेरोजगारांना मिळणारा रोजगार यात मोठे अंतर आहे. जिल्ह्यात २०२१ मध्ये १ लाख ४३ हजार ८६२ हजार बेरोजगारांची नोंदणी झाली, त्यापैकी केवळ १ हजार २६९ बेरोजगारांना नोकरी मिळाली. याची टक्केवारी केवळ ०.६६ टक्के आहे. २०२२ मध्ये १ लाख ४७ हजार ८०१ बेरोजगारांची नोंदणी झाली, त्यापैकी केवळ २४३ बेरोजगारांना नोकरी मिळाली. २०२३ च्या आठ महिन्यांतच १ लाख ४० हजार २४१ बेरोजगारांनी नोंदणी केली, त्यापैकी केवळ ९३७ बेरोजगारांना नोकरी मिळाल्याची नोंद कौशल्य विकास योजना कार्यालयात आहे. यावरून औद्योगिक जिल्ह्यात बेरोजगारांची संख्या दिवसागिणक वाढत चालल्याचे स्पष्ट होते.

हेही वाचा – पावसाचे हे चालले तरी काय? आत्ताच आला आणि आत्ता पुन्हा विश्रांती

हेही वाचा – खळबळजनक! लॉजवर प्रेयसीसोबत घालवली रात्र; सकाळी प्रियकर मृतावस्थेत सापडला

जिल्ह्यात बल्लारपूर पेपर मिल, वेकोलिच्या कोळसा खाणी, पाच सिमेंट कारखाने, महाऔष्णिक वीज केंद्र, पोलाद कारखाने, खासगी वीज प्रकल्प तथा इतरही छोटे मोठे उद्योग आहेत. एमआयडीसीत उद्योग आहेत, मात्र तिथे स्थानिकांना रोजगार नाही. बहुसंख्य तरुण बेरोजगार मुंबई, पुणे, नागपूर, बंगलोर, हैदराबाद येथे रोजगाराच्या शोधात जात आहेत. स्थानिक बेरोजगारांना नोकरी पुरवणारे उद्योग जिल्ह्यात किती आले याचे उत्तर अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनीधींकडे नाही. जिल्ह्यात असलेल्या वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी, सिमेंट उद्योग, लोहपोलाद उद्योग तसेच विविध कारखान्यांमध्ये परराज्यातील कामागरांचा भरणा आहे. त्यामुळे स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळवण्यासाठी भटंकती करावी लागत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unemployment increase in chandrapur district record of 4 lakh 31 thousand unemployed in three years rsj 74 ssb