नागपूर : राज्यात सर्वत्र १ मे रोजी महाराष्ट्र दिनासह कामगार दिन साजरा होत असतानाच नागपुरातील मेडिकल रुग्णालयात १०८ खासगी सुरक्षा रक्षकांचा रोजगार हिरावला आहे. मेडिकल प्रशासनाने एका खासगी एजन्सीची सेवा समाप्त केल्याने या कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मेडिकल प्रशासनाने मेडिकलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करणाऱ्या १०८ कर्मचाऱ्यांना (सुरक्षारक्षक) कोणतीही नोटीस न देता थेट सुरक्षा एजन्सीचे कंत्राट रद्द केले. एजन्सीनेही कोणतेही नोटीस व कारण न देता या सुरक्षा रक्षकांची सेवा समाप्त केल्याचा कामगारांचा आरोप आहे. कामगारांच्या माहितीनुसार, कामगार दिनी एका खासगी एजन्सीच्या १०८ सुरक्षा रक्षकांना ‘आजपासून तुमची सेवा संपुष्टात आल्याचे’ पत्र दिले. १२ वर्षांपूर्वी फक्त ४ हजार ४०० रुपये मासिक वेतनावर १०८ कर्मचारी रुजू झाले होते.

हेही वाचा…धक्कादायक! गृहमंत्र्यांचे गृहशहर नागपुरात दर दिवशी दोन महिलांवर अत्याचार, तीन वर्षांत २६० हत्याकांड

आता ६ हजार रुपये मासिक वेतन त्यांना मिळत होते. हे सुरक्षारक्षक सेवेत असलेल्या ‘युनिटी सेक्युरिटी फोर्स’ या खासगी एजन्सीसोबतचा मेडिकलचा करार संपुष्टात आला. सरकारच्या आदेशानुसार या एजन्सीसोबतच्या कराराचे नुतनीकरण करण्यात आले नाही, त्यामुळे एजन्सीने त्यांच्या सुरक्षा रक्षकांना सेवा समाप्तीचे पत्र दिले, असा खुलासा मेडिकल प्रशासनामार्फत करण्यात आले. मेडिकल रुग्णालयात करोनाचा पहिला रुग्ण आढळल्यापासून आजपर्यंत या खासगी सुरक्षा रक्षकांनी सेवा दिली आहे.