अकोला : जिल्हा पोलीस दलातील अनैतिक मानवी वाहतुक कक्षाकडून आतापर्यंत १०३ प्रकरणांचा उलगडा केला. जिल्ह्यातील एका प्रकरणात अकोट येथील मुलगी मुंबईमध्ये आढळून आली आहे. अनैतिक मानवी वाहतूक कक्षाकडून महिला व बाल अत्याचारासंदर्भाने कलम ३६३, ३६६ (अ) भादंवि तसेच महिला, मुलींच्या बेपत्ता प्रकरणाचा तपास करण्यात येतो. कक्षाकडून ७० गुन्हे व ३३ बेपत्ता अशा एकूण १०३ प्रकरणांचा उलगडा करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 जिल्ह्यातील एका गुन्ह्याच्या तपासात गुप्त माहितीवरून आरोपी व पीडित मुलीला ताब्यात घेण्यासाठी पथकाने मुंबई गाठली. नेरुळ पोलीस ठाण्यात जावून अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल भादंवि कलम ३६३ प्रकरणात पीडित मुलगी व आरोपीचा शोध शोध घेतला. यावेळी रुग्णालयामध्ये पीडित मुलगी उपचारासाठी दाखल असल्याची माहिती मिळाली. पीडितेला तिच्या आईच्या ताब्यात दिले. आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अकोल्यात आणले.

हेही वाचा >>> सावधान! ई-सेवा केंद्राच्या नावावर बनावट प्रमाणपत्रे!; अनेक टोळ्या सक्रिय

आरोपीला पुढील तपासाठी अकोट ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुभाष दुधगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विजय खर्चे, सुरज मंगरूळकर, धनराज चव्हाण, पुनम बचे, वाहन चालक अरविंद्र खोडे, विजय कबले, राजकन्या अंजाळे यांनी केली. इतर गुन्ह्यामध्ये सुद्धा तत्परतेने पीडित मुलगी व आरोपींचा कसून शोध घेऊन प्रकरणांचा निपटारा अनैतिक मानवी वाहतूक कक्षाद्वारे करण्यात येत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unethical human trafficker akot girl found in mumbai ppd 88 ysh
Show comments