बुलढाणा: दोन दिवसांवर मुलीचे लग्न आले असल्याने लग्न पत्रिका वाटून घरी परतणाऱ्या पित्याचा अपघाती मृत्यू झाला. मोताळा तालुक्यातील मूर्ती फाट्याजवळ ही दुर्घटना घडली. यामुळे मृतकच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा… वाशीम नगरपालिकेत कचरा संकलनात कोट्यवधीचा भ्रष्टाचार; ‘आप’चे विभागीय आयुक्तांना निवेदन, दोषींना निलंबित करण्याची मागणी

हेही वाचा… कोवळा प्रेमांकुर! अल्पवयीन बाला झाली माता म्हणून अल्पवयीन प्रियकर ताब्यात

कांशीराम मांझा (५२, रा. कुऱ्हा गोतमारा, ता.मोताळा) असे मृतकचे नाव आहे. मुलीचे लग्न २७ एप्रिलला ठरल्याने जवळच्या मंडळींना स्वतः लग्न पत्रिका वाटायचे त्यांनी ठरवले. खैरखेड येथे पत्रिका वाटून ते एम एच २८ एजे ६०९१ क्रमाकाच्या दुचाकीने घरी परतत होते. दरम्यान मलकापूर मार्गावरील पेपर मिल जवळच्या वळणावर समोरून येणाऱ्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामुळे ते गतप्राण झाले. ही वार्ता गावात येऊन धडकताच मांझा परिवाराला जबर धक्का बसला. आनंदाचे वातावरण बदलले असून गावावर शोककळा पसरली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unfortunate death of father who distributing daughters marriage wedding invitation in buldhana scm 61 asj
Show comments