राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात बॉम्बस्फोट घडवण्याच्या धमकीचा दूरध्वनी एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाला केला. त्यामुळे एकच खळबळ उडाली. पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था वाढवली. धमकी देणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यातसुद्धा सचिन कुलकर्णी नावाच्या महापारेषणच्या अभियंत्याने संघ मुख्यालयाला बॉम्बने उडविण्याची धमकी दिली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – “कर्नाटकामध्ये भाजपा स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार”, अमित शहांची मोठी घोषणा; म्हणाले, “काही लोकं जाणीवपूर्वक…”

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास पोलीस नियंत्रण कक्षाला निनावी दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालयात बॉम्बस्फोट घडविणार असल्याची धमकी दिली. नियंत्रण कक्षाने लगेच पोलीस आयुक्तांसह सर्वच वरिष्ठांना माहिती दिली. क्युआरटी कमांडोसह पोलिसांच्या तुकड्या संघ मुख्यालयात पाठविण्यात आल्या. पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी लगेच संघ मुख्यालय गाठले आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. संघ मुख्यालयाला उडविण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत. सायबर क्राईमच्या माध्यमातून निनावी फोन करणाऱ्याचे शोध घेणे सुरू आहे. गेल्या महिन्यातच सचिन कुलकर्णी नावाच्या इसमाने संघ मुख्यालय उडविण्याची धमकी दिली होती. त्याला सक्करदरा पोलिसांनी अटक केली होती. यावेळीसुध्दा पोलिसांना अशाच प्रकारचा संशय आहे. त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पोलीस विभागात खळबळ उडविण्यासाठीच कुणीतरी धमकी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा – रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विक्रमी गुंतवणूक – मोदी; पश्चिम बंगालमध्ये ‘वंदे भारत एक्सप्रेस’ सुरू

दरम्यान, संघ मुख्यालय उडविण्याची धमकीचा फोन पोलीस नियंत्रण कक्षाला आला होता. त्यामुळे पोलिसांनी मुख्यालयाची सुरक्षा वाढविली आहे. सायबर क्राईमच्या पथकाद्वारे फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेणे सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल, अशी माहिती झोन ३ चे पोलीस उपायुक्त गोरख भामरे यांनी दिली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unidentified caller threatens to blow up rss headquarters in nagpur again adk 83 spb