जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष सुभाष लांबा यांनी ही माहिती दिली.रविवारी शंकरनगर स्थित साई सभागृहात झालेल्या कर्मचाऱ्यांचा विदर्भस्तरीय कर्मचारी मेळावा आयोजित करण्यात आला होता. ‘सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लाईज ॲण्ड वर्कर्स फेडरेशन’चे सरचिटणीस आर.एन. पाराशर मेळाव्याला उपस्थित होते. लांबा म्हणाले, जुनी पेन्शन लागू करण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संपावर जाण्याची घोषणा केली आहे. त्याला देशव्यापी कर्मचारी संघटनांचे समर्थन असून ते या संपात सहभागी होणार आहेत. १४ मार्चला याच मागणीसाठी संसदेपुढे सामूहिक धरणे दिले जाणार आहे. ‘पीएफआरडीए’ कायदा रद्द करावा, जुन्या पेन्शनसह कंत्राटी कर्मचारी नियुक्ती रद्द करावी, कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करावे, त्यांना समान काम समान वेतन सूत्र लागू करावे, खासगीकरण थांबवावे, देशभरातील रिक्त ६० लाख पदे भरण्यात यावी, आदी मागण्या लांबा यांनी केल्या.
नागपूर: जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी कर्मचाऱ्यांची एकजूट, देशव्यापी आंदोलनाची घोषणा
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी केंद्र व राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.
Written by लोकसत्ता टीम
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 20-02-2023 at 09:51 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union and state government employees announce nationwide agitation to demand old pension cwb 76 amy