नागपूर: भाजपचे शक्तिशाली नेते व केंद्रीय गृहमंत्री दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून यापैकी एक दिवस ते नागपूरला येणार आहेत. या दरम्यान ते संघ मुख्यालयाला भेट देणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा… तुरुंगातून सुटका झाल्यावर अनिल देशमुख प्रथमच उद्या नागपुरातील घरी परतणार, सर्वप्रथम ‘येथे’ जाणार
प्राप्त माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारी असे दोन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. त्यांचा अद्याप अधिकृत दौरा प्राप्त झाला नाही. प्राथमिक माहितीनुसार अमित शहा यांचा १८ तारखेला नागपूरमध्ये कार्यक्रम असून १९ तारखेला कोल्हापूर येथे जाणार आहेत.
हेही वाचा… नागपूर: ‘त्या’ मुलीचा अपघात कि घातपात, पाच वर्षीय चिमुकलीचा संशयास्पद मृत्यू
नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे मुख्यालय आहे. त्यामुळे शहा त्यांच्या नागपूर दौऱ्या दरम्यान संघ मुख्यालयात जाणार का? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे, मात्र अधिकृतरित्या याला दुजोरा मिळाला नाही. शहा यांच्या नागपूर दौऱ्याचा अधिकृत कार्यक्रम अद्याप आला नसल्याने भाजप नेत्यांनी याबाबत बोलणे टाळले. नागपूर हे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे गृह शहर सुद्धा आहे. हे येथे उल्लेखनीय.