केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संघ मुख्यालय भेटीचा मुहूर्त अखेर ठरला. शहा १७ फेब्रुवारीला रात्री नागपूरला येणार असून १८ तारखेला संघ मुख्यालयाला भेट देणार आहे. या दौ-यात ते प्रसिद्ध दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना नागपूर येथे ही माहिती दिली.
हेही वाचा >>> फडणवीस जे बोलले ते खरेच, असत्य बोलणार नाही – बावनकुळे
अमित शहा नागपूर दौ-यावर येणार असल्याची माहिती होती. ते संघ मुख्यालयाला भेट देणार का? याबाबत उत्सुकता होती. अधिकृत दौरा न आल्याने भाजप नेते याबाबत काहीच बोलायला तयार नव्हते. मंगळवारी बावनकुळे यांनी शहा यांच्या दौ-याची माहिती दिली. ते म्हणाले शहा १७ ला रात्री नागपूरला येणार असून १८ ला संघ मुख्यालयाला भेट देतील. ते दीक्षाभूमीलाही भेट देणार आहे. शह यांच्या दौ-याबाबत भाजपची की बैठक झाली. अध्यक्षस्थानी बावनकुळे होते. त्यात भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.