केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या संघ मुख्यालय भेटीचा मुहूर्त अखेर ठरला. शहा १७ फेब्रुवारीला रात्री नागपूरला येणार असून १८ तारखेला संघ मुख्यालयाला भेट देणार आहे. या दौ-यात ते प्रसिद्ध दीक्षाभूमीलाही भेट देणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना नागपूर येथे ही माहिती दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> फडणवीस जे बोलले ते खरेच, असत्य बोलणार नाही – बावनकुळे

अमित शहा नागपूर दौ-यावर येणार असल्याची माहिती होती. ते संघ मुख्यालयाला भेट देणार का? याबाबत उत्सुकता होती. अधिकृत दौरा न आल्याने भाजप नेते याबाबत काहीच बोलायला तयार नव्हते. मंगळवारी बावनकुळे यांनी शहा यांच्या दौ-याची माहिती दिली. ते म्हणाले शहा १७ ला रात्री नागपूरला येणार असून १८ ला संघ मुख्यालयाला भेट देतील. ते दीक्षाभूमीलाही भेट देणार आहे. शह यांच्या दौ-याबाबत  भाजपची की  बैठक झाली. अध्यक्षस्थानी बावनकुळे होते. त्यात भाजपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union home minister amit shah to visit nagpur on 17th february next day will go rss headquarters cwb 76 zws