लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नागपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा नागपूरमध्ये २२ तारखेला येणार आहेत. पण ते शहरात येणार नाही. विमानतळावरूनच बालाघाटला जाणार आहेत. यापूर्वी शहा यांचा नागपूर दौरा ऐनवेळी रद्द झाला होता. त्यामुळे आता ते कशासाठी नागपुरात येत आहेत याबाबत चर्चा होती. पण ते नागपूरमार्गे मध्यप्रदेशातील बालाघाटला जाणार असल्याचे कळल्यावर भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

मध्यप्रदेशात पुढच्या काळात विधानसभेच्या निवडणुका आहेत. सत्ताधारी भाजपने त्यासाठी तयारी सुरू केली आहे. याच तयारीचा एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी भोपाळला जाणार आहेत.या दौऱ्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २२ जूनला मध्यप्रदेशमध्ये नागपूर मार्गे जाणार आहे. दिल्लीवरुन नागपूर विमानतळावर येऊन भोपाळ रवाना होणार असल्याची माहिती आहे.