अकोला : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या तयारीला जोर आला असून विदर्भातील पाच मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह ५ मार्चला अकोला शहरात डेरेदाखल दाखल होणार आहेत. भाजपसह शिंदे गटाचे खासदार असलेल्या पाच मतदारसंघाचा ते आढावा घेणार असल्याची माहिती आहे. या अगोदर १५ फेब्रुवारीचा त्याचा दौरा स्थगित झाला होता.

लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक एप्रिल-मे महिन्यात होणार आहे. त्यानंतर राज्यात ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची रणधुमाळी सुरू होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महापालिका, नगर पालिकांच्या रखडलेल्या निवडणुका देखील लागू शकतात. या निवडणुकांच्या वर्षासाठी प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी केली. नेत्यांसह इच्छुकांकडून मोर्चेबांधणी केली जात आहे. निवडणुकांच्या अगोदरच अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचणे, हे पक्ष व नेत्यांचे लक्ष्य आहे. निवडणुकीसाठी जुळवाजुळव व तळागाळातून मोर्चेबांधणी करण्यावर भर आहे. लोकसभा निवडणूक तोंडावर आली असताना पश्चिम विदर्भातील भाजपचा गड म्हणून ओळख असलेला अकोला लोकसभा मतदारसंघात देशाचे गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह येणार आहेत. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ-वाशीम व वर्धा लोकसभा मतदारसंघाचा ते आढावा घेणार आहेत. पक्षाच्या संचलन समितीच्या कामकाजाची माहिती घेऊन ते भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे. या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह २० संघटनमंत्री, विदर्भातील सर्व लोकप्रतिनिधी, प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर आदी उपस्थित राहतील. शहरापासून काही अंतरावर असलेल्या बाळापूर येथील एका खासगी हॉटेलमध्ये ही बैठक नियोजित करण्यात आली आहे.

Mig 29 crashes
Mig 29 Crasesh : भारतीय हवाई दलाचे मिग २९ लढाऊ विमान कोसळले; जमिनीवर कोसळताच आगीत भस्मसात!
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
problem of traffic congestion in Mahabaleshwar created difficulties at many places
महाबळेश्वरला दिवाळी हंगामापूर्वीच वाहतूककोंडी
There was no attack on BJP rebel candidate Vishal Parab car
भाजपचे बंडखोर उमेदवार विशाल परब यांच्या गाडीवर हल्ला नाही,तो वाट चुकलेला परप्रांतीय कामगार
Viral video Cars, trucks in air after hitting Gurugram speed bump
स्पीडब्रेकरला धडकून हवेत उडत आहेत गाड्या! वाहनचालकांचा जीव धोक्यात, पाहा Viral Video
eknath shinde
राज्यात पुन्हा संधी मिळाली तर, आणखी योजना राबवेन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
BJP Sanjay Kelkar is in trouble due to the allegation of hiding the crime than news
गुन्हा लपविल्याच्या आरोपामुळे भाजपचे संजय केळकर अडचणीत ? निवडणुक अधिकाऱ्यांनी हरकत फेटाळली
Konkan, Ashok Gehlot, Ashok Gehlot marathi news,
कोकण पट्ट्यातील बंडखोरांची समजूत काढण्याचे प्रयत्न, १२ जिल्हाध्यक्षांसोबत गहलोत यांची चर्चा

हेही वाचा >>>बाबो, भारतात बिबट्यांची संख्या आता १३ हजार ८७४….

उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होणार?

विभागात भाजपचे अकोल्यातून संजय धोत्रे एकमेव खासदार आहेत. गेल्या साडेतीन दशकांपासून लोकसभेच्या दोन निवडणुकांचा अपवाद वगळता भाजपने आपले वर्चस्व अबाधित राखले. खासदार धोत्रे प्रकृती अस्वास्थामुळे सक्रिय राजकारणापासून सध्या दूर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला नव्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागेल. लोकसभेची उमेदवारी धोत्रे कुटुंबात दिली जाते की इतर दुसरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला जातो, यावरून काथ्याकूट सुरू आहे. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.