लोकसत्ता टीम

नागपूर : एक्झिट पोल आले आहेत ते गोदी मीडियाचे आहे. आम्ही सर्व उमेदवारांना सांगितले आहे की शेवटचे मत मोजल्याशिवाय मतमोजणी केंद्रातून बाहेर पडायचे नाही. केंद्रीय गृहमंत्रालयाने १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले असल्यामुळे भाजप यातून घाबरले असल्याचे स्पष्ट होत आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पटोले नागपुरात बोलत होते. ते म्हणाले, सुरवातीपासून आम्ही सांगतोय की ही निवडणूक मोदी सरकार विरोधात जनता अशी झाली आहे. इंडिया आघाडीच्या माध्यमातून राहुल गांधी यांनी न्याय यात्रेच्या माध्यमातून गॅरंटी दिली. जनता विरुद्ध सरकार अशी निवडणूक झाली आहे त्यामुळे एक्झिट पोल मध्ये भाजपच्या बाजूने निकाल लागले असले तरी सरकार मात्र देशात आम्हाला बहुमत मिळणार आहे, असेही पटोले म्हणाले. देशात अटीतटीची लढाई झाली आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने १५० जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावले आहे. भाजप घाबरले आहे हे यातून स्पष्ट होते, असे पटोले म्हणाले.

आणखी वाचा-Monsoon Update : विदर्भात आजपासून मान्सूनपूर्व पावसाची शक्यता; हवामान खात्याच्या अंदाजानुसार…

विजय हा इंडिया आघाडीचा होणार, एक्झिट पोलला कुणीही घाबरायचे नाही, असे कार्यकर्त्याना त्यांनी आवाहन केले आहे. आज बैठक झाली. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांच्यासोबत बैठक झाली, (ऑनलाइन) शेवटच्या मतापर्यंत मोजणी होत नाही तोपर्यंत बाहेर पडायचे नाही, असे त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना सांगितले. महाविकास आघाडीचे महाराष्ट्रात ३५ ते ४० खासदार निवडून येतील. हा आमचा दावा नसून जनतेचा कौल असल्याचे पटोले म्हणाले.

संजय राऊत यांनी काँगेस राजकारण करीत असल्याचा आरोप केला आहे. त्यावर पटोले म्हणाले, कुणीही गोट्या खेळल्याला बसले नाही. ते १०० टक्के राजकारण करतात. आम्ही २० टक्के राजकारण आणि ८० टक्के समाजकारण करतो आहे. संजय राऊत ज्या शाळेत शिकले ती शाळा काँग्रेसने निर्माण केली आहे. त्यांचा जन्म झाला ते रुग्णालय काँग्रेसने निर्मांन केले आहे. त्यांच्या गावात वीज-पाणी काँग्रेसच्या काळात पोहचले. कालच ते लंडनहून आले, तिथल्या थंडीचा परिणाम आहे की इथल्या उन्हाचा, मी त्याबद्दल जास्त बोलणार नाही, असेही पटोले म्हणाले.

Story img Loader