लोकसत्ता टीम
वर्धा: केंद्र सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याचे औचित्य साधून भाजपने उपक्रमांचा धडाका लावला आहे. त्यात महा जनसंपर्क अभियानाच्या निमित्ताने मेळावे होत असून केंद्रीय मंत्री हजेरी लावत आहे.
वर्धा येथे २८ जूनला केसरीमल विद्यालयाच्या प्रांगणात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्यास केंद्रीय माहिती व प्रसारण तसेच युवा कार्यक्रम व क्रीडामंत्री अनुरागसिंग ठाकूर यांची हजेरी लागणार आहे. भाजपच्या राष्ट्रीय युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष राहलेले ठाकूर हे पंतप्रधान मोदी यांचे विश्वासू म्हणून ओळखले जातात. तसेच ते पक्षाच्या युवा फळीत प्रिय आहेत. पण यापेक्षा ते क्रीडामंत्री असल्याची बाब त्यांना वर्धेत आणणारी ठरली.
आणखी वाचा-”देशात दोनच ‘एम’ खोटे बोलतात, एक मीडिया, दुसरे मोदी”, खासदार असदुद्दीन ओवेसी यांची टीका
त्याचे कारण म्हणजे खासदार रामदास तडस यांनी साधलेली त्यांच्याशी जवळीक हे असल्याचे सांगितले जाते.राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असलेल्या खासदारांनी क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर असलेल्या योजनांबाबत ठाकूर यांना गळ घातली आहे. काही मार्गी लागतील.पाठपुरावा करण्यात दिल्लीच्या राजकारणात आता सरावलेल्या तडस यांनी ठाकूर यांना वर्धेसाठी निश्चित करण्यात मोलाची भूमिका पार पाडल्याचे भाजप वर्तुळात बोलले जाते.