बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जवाबदारी देण्यात आलेले केंद्रीय कामगार, वन पर्यावरण मंत्री भुपेंद्र यादव आज, शनिवारी पुन्हा एकदा बुलढाणा जिल्ह्यात येत आहे. त्यांचा हा दौरा मर्यादित व शासकीय असला तरी या भेटीत बुलढाणा मतदारसंघावर पुन्हा खलबते होण्याची शक्यता आहे.
भाजपच्या ‘मिशन ४५’ अंतर्गत बुलढाणा लोकसभा मतदारसंघाची जवाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वासू भुपेंद्र यादव यांच्यावर सोपविण्यात आली आहे. त्यांनी ‘प्रवास योजने’ अंतर्गत यापूर्वी तीनवेळा मतदारसंघाला भेटी दिल्या आहे. त्यांनी बुलढाणा, चिखली, खामगाव, शेगाव, जळगाव जामोद, मेहकर या तालुक्याना भेटी दिल्या. तसेच मतदारसंघात मुक्कामी राहून भाजपची जिल्हा सुकाणू समिती, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या समवेत लोकसभेवर चर्चा केली. याशिवाय विविध समाज घटकांशी संवाद साधला होता.
हेही वाचा… गडचिरोली महिला मृत्यूप्रकरणी आरोग्य विभागात खदखद; वरिष्ठांना वाचवण्यासाठी लहान अधिकाऱ्यांचा बळी!
या पार्श्वभूमीवर ना. यादव यांचे आज चौथ्यांदा जिल्ह्यात आगमन होत आहे. त्यांचा हा दौरा चिखली तालुक्यापुरता मर्यादित आहे. संभाजीनगर येथून चिखली येथे दुपारी १.४५ वाजता त्यांचे आगमन होणार आहे. यानंतर दुपारी दुपारी २.३० वाजता गांधीनगर ( चिखली) तर दुपारी ३:३० वाजता आदर्श विद्यालय येथे आयोजित संकल्प यात्रेच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. सायंकाळी ते छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.