नागपूर : ‘१०० कोटी रुपये द्या…अन्यथा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी आणि जनसंपर्क कार्यालयात बॉम्बस्फोट करू’, अशी धमकी देणारा फोन आला. हा फोन कर्नाटक राज्यातून आला असून ती धमकी कुख्यात डॉन दाऊन इब्राहिमच्या नावावर मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली. नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात  शनिवारी साडेअकरा ते साडेबारा वाजतादरम्यान सलग तीन धमकीचे फोन आले. त्यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांच्या खामल्यातील जनसंपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी ११.२८ मिनिटांनी एक फोन आला. जीतेंद्र शर्मा याने तो फोन उचलला. समोरच्याने थेट दाऊद इब्राहिमचे नाव घेऊन गडकरींनी १०० कोटी रुपयांची खंडणी द्यावी अन्यथा आम्ही भाजपाच्या जनसंपर्क कार्यालयात आणि नितीन गडकरी यांच्या घरी बॉम्बस्फोट करू’ अशी धमकी दिली. खंडणीसाठी फोन आल्यामुळे जितेंद्र शर्मा यांनी गडकरींचे कुटुंबिय आणि खासगी सहायकांना फोन करून माहिती दिली. तसेच भाजपाच्या काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनाही माहिती दिली. त्यानंतर १० मिनिटांतच म्हणजे ११.३८ मिनिटांनी दुसरा फोन आला.

हेही वाचा >>> धक्कादायक : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; दाऊदच्या नावाने फोन करून मागितली खंडणी!

१०० कोटींच्या खंडणी मागणी करीत पैसे न दिल्यास बॉम्बस्फोट करण्याची पुन्हा धमकी देण्यात आली. त्यानंतर  खळबळ उडाली. गडकरी यांच्यापर्यंत ही बातमी गेली. पोलीस, एटीएस पथकांना लगेच माहिती देण्यात आली. यादरम्यान १२.३० मिनीटांनी पुन्हा फोन आला आणि पुन्हा धमकी देण्यात आली. त्यामुळे पोलिसांनी लगेच   गडकरी यांच्या घरी सुरक्षा व संपर्क कार्यालयात  सुरक्षा व्यवस्था वाढवली.

हेही वाचा >>> सत्यजीत तांबे यांना पाठिंबा देण्याबाबत बावनकुळेंचे सूचक वक्तव्य, म्हणाले “आम्ही संन्याशी…”

 धमकीचे फोन येताच पोलीस उपायुक्त मदने, अनुराग जैन आणि गुन्हे शाखेचे मुमक्का सुदर्शन यांनी गडकरींच्या कार्यालयाला भेटी देऊन सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला. आज सायंकाळी नितीन गडकरी यांचे कार्यक्रम आहेत. त्यामुळे पोलिसांनी गांभीर्य दाखवून कार्यक्रमस्थळीसुद्धा मोठा बंदोबस्त लावणार आहेत.

सायबर क्राईम पथकाच्या वेगात हालचाली

गडकरी यांना खंडणीसाठी फोन येताच पोलीस यंत्रणा कामाला लागली. फोन कुठून आला? लोकेशन कुठले आहे? आणि फोन करणाऱ्यांबाबत माहिती गोळा करण्यासाठी सायबर क्राईचे पथकाने वेगाने हालचाली सुरु केल्या. कर्नाटक राज्यातून फोन होता, ही माहिती पोलिसांच्या हातील लागली असून नंबर काढण्यात आला असून कर्नाटक पोलिसांची मदत घेऊन फोन करणाऱ्यांचे लोकेशन काढण्यासाठी सायबर क्राईम विभाग धावपळ करीत आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkari house bomb blast threat on phone adk 83 ysh