नागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आपल्या बिनधास्त बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. शनिवारी नागपुरातील मथूरादास मोहता विज्ञान काॅलेजला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माजी विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमातही त्यांनी मुलाच्या व्यवसायाबाबत नवीन माहिती दिली. त्यांच्या मुलाने गोवा येथून ३०० कंटेनर मासोळी घेऊन सर्बिया या देशात पुरवठा केल्याचे सांगितले. गडकरी पुढे म्हणाले, लवकरच ॲडव्हांटेज विदर्भ हा कार्यक्रम घेणार आहे. त्यातून येथील व्यवसाय बळकट करण्यासह नवीन व्यवसायाची संधी उपलब्ध केली जाईल. विदर्भातील तलावात चांगले झिंगे तयार होतात. या झिंग्याला नागपुरात ८०० रुपये प्रति किलो भाव आहे. दरम्यान सिंगापूरला झिंग्याला ८ हजार रुपये प्रति किलो तर दुबईत ७ हजार रुपये प्रति किलो भाव आहे. त्यामुळे येथील झिंगे तेथे पाठवल्यास मत्स व्यवसायिकांना मोठा लाभ शक्य आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा