नागपूर : शेत पंपाच्या विजेसाठी सरकारवर, वीज मंडळावर विसंबून राहू नका. कारण, सरकार आणि परमेश्वर यांचे केव्हा आशीर्वाद मिळतील आणि केव्हा गायब होतील, याचा काही भरवसा नाही, असे वक्तव्य केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केले. विदर्भ शेतकरी उत्पादक कंपन्यांची कार्यशाळा नागपुरातील वनामतीच्या सभागृहात मंगळवारी आयोजित करण्यात आली होती, याप्रसंगी ते बोलत होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गडकरी म्हणाले, शेतीचे सिंचन करण्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध नाही. गावाकडे गेल्यानंतर हा प्रश्न प्रकर्षाने जाणवला. शेत पंपाला दिवसभर वीज मिळत नाही. ही बाब माझ्या पत्नीने माझ्या लक्षात आणून दिली. ही समस्या सोडवण्यासाठी सगळ्यांनी रूफ टॉप सोलर बसवून घ्यावे. विजेसाठी सरकार किंवा वीज मंडळावर विसंबून राहू नये. कारण, सरकार आणि परमेश्वर या दोघांचा केव्हा आशीर्वाद मिळेल आणि केव्हा गायब होईल यांचा काही भरवसा नाही. तेव्हा सोलर पंप लावून सकाळी ८ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शेतीला पाणी देण्याची खात्रीशीर व्यवस्था करावी. त्यासाठी विविध योजनेतून सोलर पंप बसवून घेतले पाहिजे. त्याशिवाय काही पर्याय नाही.

हेही वाचा >>> Maharashtra News Live : महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर!

शिवाय नदीनाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण करावे लागेल. यावेळी गडकरी यांनी अनुदानासाठी वाट्टेल ते करणाऱ्यांनाही खडे बोल सुनावले. ते म्हणाले, आपल्याला दोन सवयी जडलेल्या आहेत. पहिली म्हणजे बिगर भरतीची. काहीतरी करून कोणाच्यातरी माथी मारण्याची सवय आणि दुसरी सवय म्हणजे फसवणूक करून अनुदान मिळवण्याची होय. चोरीचकाट्या करा आणि सरकारचे अनुदान मिळवा, अशा गोष्टी करणारे आयुष्यात मोठे होऊ शकत नाही. प्रामाणिकपणाने काम करायचे आणि मिळत असेल तर अनुदान घ्यावे. त्यात काही वागवे नाही, पण शक्यतोवर अनुदानाच्या भरवश्यावर विसंबून राहू नये, असेही गडकरी म्हणाले. देशातील फळ, फुलांच्या गुणवत्तेवरही त्यांनी परखड भाष्य केले. आपल्याकडील फळांची, फुलांची गुणवत्ता दर्जेदार नाही. आपल्याकडे जो भाजीपाला पिकवला जातो, त्याला जर १०० टक्के गुण द्यायचे ठरवल्यास, केवळ एखाद्याला ३३ टक्के गुण मिळू शकतील. इतर कोणीही उत्तीर्ण होण्याच्या लायकीचा नाही, असे गडकरी म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister nitin gadkari suggestion maharashtra farmers over electricity zws