लोकसत्ता टीम
नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांचे अनेक चित्रपट अभिनेत्यांशीही जवळचे संबंध आहेत. मागील काही महिन्यांआधी त्यांनी महानायक अमिताभ बच्चन यांच्या घरी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी नुकतीच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांची चेन्नई येथे त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.
नागपुरातील एका कार्यक्रम गडकरींनी हा किस्सा सांगितला. रजनीकांत यांच्या घरी जाताच त्यांच्या दारासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा मोठा फोटो गडकरींना दिसला. हा फोटा पाहून ते भारावले होते. तो फोटो अनेकांना प्रेरणा देणारा होता. त्यासाठी रजनिकांत यांचे खूप कौतुकही केल्याचे गडकरींनी सांगितले. शिवाजी महाराज हे आपल्या सर्वांचे दैवत असून त्यांच्याप्रमाणे काम करण्याची प्रेरणा आपल्या सर्वांना मिळायला हवी असेही गडकरी म्हणाले.