काँगेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो’ यात्रा ही खऱ्या अर्थाने ‘भाजपा जोडो’ यात्रा असल्याचा खळबळजनक विधान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले. त्यांच्या या विधानाचे राज्यभरात पडसाद उमटण्याची शक्यता आहे. विदर्भ वंजारी समाज सेवा परिषदेच्यावतीने बुलढाण्यात वंजारी समाज मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना कराड यांनी हे वक्तव्य केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ते पुढे म्हणाले, राहुल गांधीची यात्रा महाराष्ट्रात आली आहे. ते जेवढे फिरतील तेवढा त्याचा लाभ भाजपला होईल. आतापर्यंतचा इतिहास आहे की, राहुल गांधी ज्या-ज्या राज्यात गेले त्या-त्या राज्यात काँग्रेसची पिछेहाट झाली. त्यांची भारत जोडो यात्रा ही नावापुरतीच आहे. ही खरेतर त्याला भाजपा जोडो यात्रा म्हणता येईल. कारण, राहुल गांधी हे त्यांच्याच पक्षाचे नुकसान करतात असा आरोपही त्यांनी केला आहे.

हेही वाचा- पुलंच्या स्मृतींचा जगभरात जागर; वर्षभर रंगणाऱ्या ‘ग्लोबल पुलोत्सव’ची घोषणा

गोपीनाथ मुंडेंमुळे वंजारी समाजाला देशपातळीवर ओळख

वंजारी समाज मेळावा व गुणवंत सत्कार सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कराड म्हणाले की, काही दशकांपूर्वी सर्वच दृष्टीने अविकसित व मागासलेल्या वंजारी समाजाला दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्यामुळेच देश पातळीवर ओळख मिळाली. गोपीनाथ मुंडे यांनी समाजासाठी संघर्ष करीत, केवळ ओळख न देता समाजबांधवांमध्ये आत्मविश्वास, दुर्दम्य आशावाद निर्माण केला. यामुळे आज सर्वच क्षेत्रात समाजातील व्यक्ती आपल्या कर्तबगारीने तळपत असल्याचे ना. कराड यांनी सांगितले.

हेही वाचा- ‘राजकीय पक्षांनी नेत्यांसाठी आचारसंहिता तयार करावी’; चंद्रकांत पाटील यांची सूचना

‘जी-२०’ परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण

विदर्भ वंजारी समाज मेळाव्यानिमित्त येथे दाखल झालेल्या अर्थ राज्यमंत्री कराड यांनी आपले भाषण आटोपते घेत, जी-२० परिषदेच्या बोधचिन्ह अनावरण कार्यक्रमा ‘ऑनलाईन’ हजेरी लावली. जी- २० राष्ट्रांची परिषद पुढील वर्षी २००३ मध्ये भारतात आयोजित करण्यात आली आहे. या प्रस्तावित परिषदेच्या बोधचिन्हाचे अनावरण दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister of state for finance bhagwat karad on rahul gandhi bharat jodo yatra dpj
Show comments