लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
वर्धा: केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांचा विदर्भ दौरा ग्रामीण भागासाठी फलदायी ठरला. गावात केंद्रीय मंत्री येताहेत अन् त्या भेटीचा फायदा करून घेणार नाही ते खासदार कसले.
कराड यांच्या नागपूर व वर्धा दौऱ्यात खासदार रामदास तडस यांनी जणू पिच्छाच पुरवला. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या ११४ व ग्रामीण बँकांच्या सहा शाखा सेवा देण्यास अपुऱ्या ठरतात. जिल्हा बँकांच्या आट्ठेचाळीस शाखा बंद पडल्याने शेतकरी बँक सेवापासून वंचित झाला असल्याचे तडस यांनी निदर्शनास आणले. काही ठिकाणी शाखा सुरू करणे आवश्यक आहे.
आणखी वाचा-अकोला: दोन गटातील वादातून दगडफेक, एकाचा मृत्यू; शहरात जमावबंदी लागू
तळेगाव टालातुळे, दहेगाव गोसावी, रसुलाबाद, नारा, वेळा व अन्य मोठ्या गावात बँक शाखा आवश्यक ठरतात. या गावाच्या पाच किलोमीटरच्या परिघात शाखा नाहीत. सर्व आर्थिक व्यवहार दूरवर जावून करावे लागतात. म्हणून शाखा उघडून दिलासा द्यावा, अशी विनंती तडस यांनी केली.
ते म्हणाले की मंत्री कराड यांनी अत्यंत सकारात्मक प्रतिसाद दिला. हे मुद्दे त्यांना पटले आहेत. स्पष्ट हमी मिळाली नाही, पण या शाखा सुरू होतील अशी खात्री मी देवू शकतो. पाच हजारांवर लोकसंख्या असलेली ही पाच गावे रिझर्व्ह बँकेच्या निकषात बसतात, असा विश्वास तडस यांनी व्यक्त केला आहे.