बुलढाणा : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रताप राव जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्या समक्ष महत्वाचा प्रस्ताव ठेवला आहे.महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय आणि विदयापीठ निर्माण करावे तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील शासकीय कर्मच्या-यांना आणि सेवानिवृत्त कर्मचा-यांना ॲलोपॅथी सोबतच आयुर्वेदिक उपचारही मोफत मिळावा असा प्रस्ताव केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> साहित्य संमेलनासाठी महाराष्ट्र सदन मिळेना! शुल्काच्या मुद्द्यावर चार महिन्यांपासून खल

केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव हे बुधवारी,आठ जानेवारीला मुंबई दौ-यावर होते. या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयुष मंत्रालयाची स्थापना करुन देशात आयुर्वेद उपचार पध्दतीला नविन दालन उपलब्ध करुन दिले आहे. देशातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीकोनातुन हर घर आयुर्वेद उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्या वतीने विविध उपक्रम आणि उपचार पध्दती संदर्भाची माहीती नागरीकांपर्यंत पोहचविण्याचे काम करण्यात येत आहे. आयुर्वेदीक उपचार पध्दतीला देशातील नागरीकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे, असे नामदार जाधव यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्र राज्यामध्ये आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी नविन स्वतंत्र मंत्रालयाची आणि आयुष विदयापीठाची निर्मीती करण्यात यावी या संदर्भांचा प्रस्ताव त्यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला.

हेही वाचा >>> लोकजागर : पोलीस करतात काय?

आयुष मंत्रालयाच्या माध्यमातुन सार्वजनिक आरोग्य, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण, जागतिकीकरण आणि गुणवत्ता वाढीसाठी भरीव काम करण्यात येत आहे. देशाअंतर्गत आयुर्वेद उपचार पध्दतीचा स्विकार नागरीक करु लागले आहे. महाराष्ट्रातील लोकही प्राचीन आयुर्वेद उपचार पध्दतीचा अवलंब करत असल्याने आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातुन स्वतंत्र आयुष मंत्रालय किंवा आयुष विभाग स्थापन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मच्या-यांना राज्यस्थान दिल्ली व अन्य राज्यामध्ये मधुमेह, मूळव्याध, त्वचारोग, व इतर आजारांवर ॲलोपॅथीसोबतच आयुर्वेद उपचार मोफत मिळतो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मच्या-यांना मोफत आयुर्वेद उपचार मिळावा असा प्रस्तावही राज्याचे  फडणवीस यांच्याकडे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी मांडला. या प्रस्तावा संदर्भांत मुख्यमंत्री आणि केंद्रीय आयुषमंत्री यांच्या विचारविनिमय होवुन लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांना दिले. यावेळी बुलढाणा जिल्ह्यातील जळगांव मतदारसंघांचे आमदार संजय कुटे देखील उपस्थित होते.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister pratap rao jadhav meet cm devendra fadnavis given proposal for maharashtra state scm 61 zws