नागपूर : मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर सभेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याच्या मागणीचा पुरुच्चार केला. एवढेच नव्हेतर ही मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारला आठ दिवसांची मुदत दिली आहे. यामुळे आज राज्यातील विविध ओबीसी संघटना आणि राजकीय पक्षाच्या ओबीसी सेलच्या बैठका होत आहे. या पाश्वर्भमीवर केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी ओबीसीप्रमाणे मराठा समाजाला देखील आरक्षण दिले गेले पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. ते आज नागपुरात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधत होते. ते म्हणाले, जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटी येथे उपषोण केले होते. त्यावेळी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आपण गेलो होतो.
आरक्षण मिळावे या मागणी आमचा आधीपासून समर्थन आहे. ओबीसी समाजाला क्रिमिलेअरच्या आधारे आरक्षणचा लाभ मिळतो. त्याच प्रमाणे मराठा समाजातील ज्यांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या खाली आहे. त्यांना आरक्षण दिले गेले पाहिजे. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळावे ही आमची आधीपासून भूमिका आहे. जरांगे पाटील यांनी ओबीसीमधून आरक्षण मागत आहे. तर ओबीसी समाज त्याचा विरोध करीत आहे. यातून काय मार्ग काढायचा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजीत पवार यांनी सांगितले. ओबीसी किंवा मराठा समाजाला अन्याय होता कामा नये. गरीब मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे, ही आमची मागणी आहे.