नागपूर : केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे राज्यासाठी राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र (एनसीडीसी) शाखा आणि मेट्रोपोलीटन सर्वेलन्स युनिट (एमएसयू) नागपूर महापालिकेमध्ये स्थापन करण्याचा निर्णय झाला आहे. या मध्य भारतातील पहिल्या केंद्रामुळे उपराजधानीत संसर्गजन्य आजाराची लगेच तपासणी व त्यावर नियंत्रणासाठी तत्काळ उपाय होण्यास मदत होणार आहे.
सदर प्रकला आहे. या केंद्रासाठी आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग दिल्लीचे संयुक्त सचिव गुलाम मुस्तफा यांच्या अध्यक्षतेतील चमूने नुकतीच भेट देत पाहणी केली होती. सदर प्रकल्पासाठी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, डॉ. आराधना भार्गव, डॉ. दीपक सेलोकर, डॉ. नरेंद्र बहिरवार परिश्रम घेत आहे. दरम्यान, या प्रकल्पासाठी १७ कर्मचारी घेतले जाणाल्पानुसार नागपूर महापालिकेच्या अखत्यारित एक अद्ययावत प्रयोगशाळाही कार्यान्वित होईल. या प्रयोगशाळेत अँथ्रॅक्स, चिकन पॉक्स, चिकनगुनिया, डेंग्यू, डिप्थीरिया, मानवी रेबीज, लेप्टोस्पायरोसिस, हिवताप, गोवर, मेंदूज्वर, गलगंड, पेर्ट्युसिस, स्क्रब टायफस, टायफस, इबोला व्हायरस रोग, झिका व्हायरस, निपाह, पिवळा ताप, ब्रुसेलोसिस इत्यादी आजाराची लगेच तपासणी होईल. त्यात आजाराचे निदान झाल्यास हे केंद्र महापालिकेच्या आरोग्य विभागाला या आजारावर नियंत्रणासाठी आवश्यक उपाय सुचवेल.
हेही वाचा…भंडारा : वाघाला चक्क गावकऱ्यांनीच घेरले अन…
महापालिकेच्या के. टी. नगर आरोग्य केंद्रात हे मेट्रोपोलीटन सर्वेलन्स युनिट सज्ज होणार आहे. त्यासाठी महापालिका व राष्ट्रीय रोगनियंत्रण केंद्र, आरोग्य व कुुटुंब कल्याण विभागात सामंजस्य करार झार असून या प्रकल्पासाठी पायाभूत सुविधा उभारण्यासाठीची निविदा प्रक्रिया लवकरच होणार असल्याचेही डॉ. दीपक सेलोकर यांनी सांगितले.
संसर्गजन्य रोगांचा उद्रेकाचा धोका लक्षात येऊन या युनिटमुळे तातडीने त्यावर उपाय शक्य होईल. अद्ययावत प्रयोगशाळेमुळे सगळ्याच गंभीर संसर्गजन्य आजाराच्या तपासण्या येथेच वेळेवर होऊन आजार नियंत्रणास मदत होईल. डॉ. दीपक सेलोकर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, महापालिका, नागपूर.
हेही वाचा…‘एनआयए’ची अमरावतीत छापेमारी; संशयित युवक ताब्यात, पाकिस्तान कनेक्शन….
घडामोडी काय?
आरोग्य व कुटूंब कल्याण विभाग दिल्लीचे संयुक्त सचिव घुलाम मुस्तफा यांच्या अध्यक्षतेतील चमूने काही आठवड्यापूर्वी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांची भेट घेउन त्यांच्याशी मेट्रोपोलीटन सर्वेलन्स यूनिट (एमएसयू) बाबत चर्चा केली. यावेळी एपीएचओ नागपूर तथा राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्रच्या नोडल अधिकारी डॉ. आराधना भार्गव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच विद्युत आणि अग्निशमन विभागाचे अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर महापालिकेने सकारात्मक पाऊल उचलल्यावर या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला