नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. यात महाराष्ट्रासह उपराजधानीच्या निकालाचा टक्का वाढला आहे. भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र नागपूरमधून सात उमेदवारांनी मुलाखती दिल्या होत्या. यातील चार उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली आहे. यात अमित इंदूवाडे, राजश्री देशमुख, राहुल आत्राम आणि प्रतीक कोरडे यांचा समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती.यात नागपूरच्या भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्रातील चार विद्यार्थी पात्र ठरले होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल केंद्राचे संचालक डॉ. प्रमोद लाखे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच प्रशिक्षण केंद्रामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत होत असल्याचेही ते म्हणाले.