आकाशातील विविध प्रकारच्या आकर्षक घडामोडी मानव प्राचीन काळापासून पाहत आहे. यातील काही महत्त्वपूर्ण घटना आगळीवेगळी अनुभूती देऊन जातात. या आठवड्यात अशाच प्रकाराच्या दोन खगोलीय घटना नुसत्या डोळ्यांनी पाहता येतील, अशी माहिती विश्वभारती केंद्राचे संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.

हेही वाचा >>>नागपूर: अल्पवयीन मुलीची पोटदुखीची तक्रार अन् गर्भवती असल्याचे झाले निदान; प्रियकराविरुद्ध बलात्काराचा गुन्हा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिनी सायंकाळी ७.३० आकाश मध्याजवळ चंद्राचे खाली लालसर रंगाची चांदणी मंगळ ग्रहाची असेल. जरा थोडेसे खाली प्रकाशमान चांदणी वृषभ राशीतील रोहिणी नक्षत्राची राहणार आहे. हा आकाश नजारा काही भागात पिधान स्वरूपात पाहता येईल. याक्षणी चंद्र-सूर्य ग्रहणाप्रमाणे मंगळ ग्रह काही वेळापुरता चंद्र बिंबाआड झाकला जातो, यालाच ‘पिधानयुती’ म्हणतात. मात्र, आपल्या भागात मात्र ही स्थिती एकमेकाजवळ अर्थात युती स्वरूपात पाहता येईल. आणखी जरा खालील बाजूस दोन ठळक दिसणाऱ्या चांदण्या सूर्यमालेतील सर्वात मोठा असलेला गुरू ग्रह व सर्वात तेजस्वी ग्रह शूक्र यांच्या असतील. २ मार्च रोजी घडणाऱ्या गुरू, शुक्र ग्रह युतीचा आणखी एक खगोलीय घटना दिसेल. या अनोख्या आकाश नजारांचा सर्व खगोलप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन विश्वभारती केंद्राद्वारे करण्यात आले आहे.