नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा सध्या सुरू आहेत. मात्र, विद्यापीठाने बकरी ईदच्या सुट्टीमुळे काही परीक्षा रद्द केल्या आहेत. याबाबत एक परिपत्रक काढण्यात आले असून २९ जूनला होणाऱ्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

आता या परीक्षा ९ जुलैला होणार आहे. महाविद्यालयांनी याची नाेंद घ्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मे महिन्यापासून सुरुवात झाली आहे. त्यानुसार परीक्षेचे वेळापत्रकही तयार करण्यात आले. बकरी ईदच्या सुट्टीबाबत शासनाने नवीन निर्णय जाहीर केला आहे. यामुळे आता बकरी ईदची सुट्टी ही २९ जूनला राहणार आहे.

हेही वाचा… शेगाव, दुसरबीडमध्येही आषाढीला ‘कुर्बानी’ नाही!; मुस्लीम बांधवांचा निर्णय

मात्र, वेळापत्रकानुसार या दिवशी परीक्षा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यापीठाने आता २९ जूनच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. आता ही परीक्षा ९ जुलैला होणार आहेत. याची नोंद परीक्षा कक्ष, प्राचार्य, केंद्रप्रमुखांनी घ्यावी असे आवाहन परीक्षा विभागाने केले.