नागपूर : काटोल तालुक्यातील कातलाबोडी गावातील नागरिकांनी पुढाकार घेऊन सात सदस्य व सरपंच अशा आठही जागांवर महिलांची बिनविरोध निवड केली.यासाठी या भागाचे आमदार व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. बुधवारी सकाळी नागपूर येथील देशमुख यांच्या निवास्थानी बिनविरोध निर्वाचित सरपंच व सदस्यांच्या सत्कार करण्यात आला.
सरंपचपदी अर्चना ललीत खोब्रागडे तर सदस्य म्हणून शिल्पा राहुल इरपाची, अल्का नरेश कोकडे, पल्वी ईश्वर रामगूडे, आशा सुधारक वलके, करिश्मा राहुल भड, संजना सुधारक खंडाते, सुरेखा राम मरकामे यांची निवड झाली. यानिमित्ताने राष्ट्रवादीने (शरद पवार गट) काटोल तालुक्यात ग्राम पंचायत निवडणुकीत खाते उघडले आहे.