लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अकोला : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.

नागपूर ते मुंबई एकेरी विशेष गाड्या धावणार आहेत. विशेष गाडी क्रमांक ०१२६२ नागपूर येथून ०४ डिसेंबर रोजी २३.५५ वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १५.३० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२६४ नागपूर येथून ०५ डिसेंबर रोजी ०८.०० वाजता सुटेल आणि मुंबई येथे त्याच दिवशी २३.२० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०१२६६ नागपूर येथून ०५ डिसेंबर रोजी १५.५० वाजता सुटेल आणि मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १०.५५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०२०४० नागपूर येथून ०७ डिसेंबर रोजी १३.२० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे दुसऱ्या दिवशी ०४.१० वाजता पोहोचेल. या गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगांव, धामणगांव, बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, जलंब, मलकापुर, भुसावल, जळगांव, चाळिसगांव, मनमाड, नासिक रोड, इगतपुरी, कसारा, कल्याण आणि दादर येथे थांबे राहील. दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अशी गाडीची संरचना राहणार आहे.

आणखी वाचा-वर्षभरानंतर होणार राज्यसेवा पूर्व परीक्षा; याबद्दल जाणून घ्या महत्वाच्या बाबी

विशेष गाडी क्रमांक ०१२४९ मुंबई येथून ६ डिसेंबर रोजी १६.४५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १०.०५ वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२५१ मुंबई येथून ६ डिसेंबरला १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२५३ दादर येथून ७ डिसेंबर रोजी ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२५५ मुंबई येथून ७ डिसेंबर १२.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी ०३.०० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२५७ मुंबई येथून ८ डिसेंबर १८.३५ वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी १२.१० वाजता पोहोचेल. विशेष गाडी क्रमांक ०१२५९ दादर येथून ८ डिसेंबर ००.४० वाजता सुटेल आणि नागपूर येथे त्याच दिवशी १६.१० वाजता पोहोचेल. या गाडीला दादर, कल्याण, कसारा, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगांव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगांव, पुलगांव, वर्धा, सेवाग्राम आणि अजनी येथे थांबा राहील. दोन गार्ड ब्रेक व्हॅनसह १६ सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे अशी गाडीची संरचना राहणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unreserved special trains will run from nagpur to csmt on occasion of mahaparinirvan day ppd 88 mrj