लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुलढाणा: जिल्ह्यात रात्रभर कमी अधिक प्रमाणात बरसणाऱ्या अवकाळी पावसाने आज सकाळी रताळी( ता सिंदखेडराजा) गावात रौद्र रूप धारण केले. येथे वीज कोसळून १६ बकऱ्या ठार झाल्या. यावेळी प्रसंगावधान दाखविल्याने दोघा व्यक्तींचे प्राण बचावले.

प्राथमिक माहितीनुसार रताळी येथे आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान, वीज कोसळून भिकाजी जाधव यांच्या १६ बकऱ्या दगावल्या. यावेळी शेतमालक भिकाजी सखाराम जाधव व शशिकला आव्हाळे यांनी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या खाली आसरा घेतल्याने ते बचावले.

आणखी वाचा- चंद्रपूर: सर्वत्र रात्रभर वादळी वाऱ्यासह पाऊस; वीज आणि पाणी पुरवठा खंडित, झाडे कोसळली

घटनास्थळी महसूल विभागाचे कर्मचारी व पोलीस दाखल झाले आहे. सरपंच उषा पाटील यांनी ही माहिती दिली. पंचनामा करण्यात येत असून अहवाल सिंदखेडराजा तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येणार असल्याचे तलाठी शेळके यांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain 16 goats killed by lightning scm 61 mrj