बुलढाणा : ऐन हिवाळ्यात रविवारी रात्री जिल्ह्यातील तब्बल ९ तालुक्यांना अतिवृष्टीसदृश आणि मुसळधार पावसाचा जबर तडाखा बसला. सिंदखेडराजा, देऊळगाव राजा व लोणार या तालुक्यांत अतिवृष्टीसारखा पाऊस झाला तर अन्य तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली. पावसाळ्यातदेखील झाला नाही इतका पाऊस काही तासांतच कोसळला.
हेही वाचा – कौडण्यपुर यात्रा! विदर्भाचे पंढरपूर; रुक्मिणीहरण व विविध आख्यायिका…
हेही वाचा – “पूर्वजांचा अशांत आत्मा भटकत असून…”, भूतबाधेची भीती दाखवून महिलेला लुटले; दोघांना अटक
सिंदखेडराजा तालुक्यात रात्री पावणेदहा ते आज, सोमवारी सकाळपर्यंत ८४.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. याखालोखाल देऊळगाव राजा ८२.४ मिमी तर मेहकर तालुक्याला ७० मिमी पावसाचा तडाखा बसला. लोणार तालुक्यातही ६५ मिमी पावसाची नोंद झाली. सिंदखेडराजा व मेहकर विधानसभा मतदारसंघावर निसर्गाचा कोप झाल्यासारखे चित्र आहे. याशिवाय जळगाव ४५ मिमी, संग्रामपूर ४०, बुलढाणा ५६, खामगाव २७, शेगाव ५२, मलकापूर ५३, मोताळा ३७, नांदुरा ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी ६० मिमी पावसाने हजेरी लावली.