चंद्रपूर : जिल्ह्यात सकाळी सात वाजेपासून सर्वत्र अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. सोमवारी सकाळी पासून वातावरण ढगाळ होते. त्यानंतर सकाळी सात वाजता पासून मुसळधार अवकाळी पावसाचा सुरुवात झाली. हा पाऊस जिल्ह्यात सर्वदूर आहे. पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. एकीकडे थंडीचा गारवा असताना अवकाळी पावसामुळे वातावरण आणखी थंड झाले आहे. शेतात रब्बी पिके उभी आहेत. अशात पाऊस सुरू झाल्याने शेतीचे मोठे नुकसान या पावसामुळे होणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा : विदर्भ आणि मराठवाड्यात आज गारपिटीचा इशारा; बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यांत “ऑरेंज अलर्ट”

जिल्ह्यातील काही तालुक्यात विजांच्या कडकडाटसह पावसाने हजेरी लावली आहे. तर काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडतो आहे. त्यामुळे ऐन हिवाळ्यात जनजीवन विस्कळित झाले आहे.दिवाळी नंतर वातावरणात अचानक बदल झाला आहे. या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता कृषी अधिकारी यांनी वर्तवली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Unseasonal rain started in chandrapur farmers worried rsj 74 css