लोकसत्ता टीम
बुलढाणा : निवडणुकीचा मोसम ऐन बहरात असताना आज, मंगळवारी विजेच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली. परिणामी कडक उन्हामुळे त्रस्त लाखो जिल्हावासीयांना दिलासा मिळाला आहे.
आज सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. बुलढाण्यात पंधरा ते वीस मिनिटे पाऊस बरसला. मोताळा तालुक्यात पावसाचा जोर जास्त होता. तालुक्यातील धामनगाव बढे येथे मुसळधार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी कमी, मध्यम स्वरूपाचा पावसाची नोंद झाली. यामुळे जिल्ह्यात ४० ते ४१ डिग्री सेल्सियस पर्यंत गेलेल्या तापमानात यामुळे घट होण्याची शक्यता आहे. मात्र याचा तापलेल्या राजकारणावर परिणाम होणार नाही हे नक्की.
आणखी वाचा-चंद्रपूर : धक्कादायक! शिपायास कायमस्वरूपी करण्यासाठी दीड लाख मागितले
खामगाव तालुक्यात गारपीट
खामगाव तालुक्यात मंगळवारी दमदार पावसाने हजेरी लावली आहे. यादरम्यान लोखंडा, चिंचपूर, गणेशपूर परिसरात जोरदार गारपीट झाली.