लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
अमरावती: जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ३ हजार २०० हेक्टरमधील पिकांचे नुकसान झालेले असताना मे मध्ये अवघ्या तीन दिवसांतील वादळी पावसाने तब्बल ४ हजार ९७१ हेक्टरमधील पिकांची हानी झाली आहे. आता शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत.
मार्च महिन्यापासून जिल्ह्यात बारा वेळा अवकाळी पावसाने हादरा दिला. यात रब्बी पिकांसह भाजीपाला आणि फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २ मे रोजी झालेल्या अवकाळी पावसाने मोर्शी, भातकुली, दर्यापूर आणि अचलपूर तालुक्यांत ४ हजार २८३ हेक्टरमध्ये, ३ मे रोजी पुन्हा अचलपूर तालुक्यात २११ हेक्टर तर ४ मे रोजी मोर्शी तालुक्यात २१० आणि अचलपूर तालुक्यात २६५ हेक्टरमधील गहू, कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याचा जिल्हा प्रशासनाचा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा… खगोलप्रेमींनी पाहिले छायाकल्प चंद्रग्रहण; ग्रहण घडते कसे, वाचा सविस्तर…
नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी दिले आहेत.
गेल्या एप्रिल महिन्यातील ९ दिवसांत जिल्ह्यात साधारण ६७ मिमी. पावसाची नोंद झाली. या पावसामुळे तब्बल ३२०० हेक्टर शेतजमिनीवरील पिके नष्ट झाली असून, १३ गोठ्यांसह २,१०५ इमारतींची पडझड झाली. यापैकी २५ एप्रिलपर्यंतच्या नुकसानासाठी जिल्हा प्रशासनाने २ कोटी ४९ लाख ८ हजार ६६० रुपयांच्या अनुदानाची मागणी केली आहे.
हेही वाचा… अकोला: धान्यांऐवजी थेट रक्कमेच्या योजनेची अंमलबजावणी रखडली
मे महिन्यातील तीन दिवसांत ४ हजार २८३ हेक्टरमधील नुकसान जोडले गेल्याने या मागणीच्या रकमेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात अचानक वातावरणात बदल झाला. शेतातील उभी पिके, बाजारात मोठ्या प्रमाणात तोलाई करुन ठेवलेले अन्न-धान्य आणि इतर चीजवस्तू अगदी वेळेवर स्थलांतरीत करणे शक्य न झाल्याने सामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना वादळी पावसाचा फटका सहन करावा लागला. उन्हाळी मूग, भुईमूग, कांदा, हरभरा, गहू, टोमॅटो, मिरची, कोहळे आदी भाजीपाल्यासह संत्रा, मोसंबी, डाळींब, आंबा अशा फळपिकांचे नुकसान झाले.
हेही वाचा… सहा विद्यापीठांची ‘डी लिट’, तरीही नावापुढे डॉक्टर लावत नाही, गडकरींनी सांगितले कारण
राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा प्रशासनाने तातडीने नुकसानीच्या पंचनाम्याचे आदेश दिले. कृषी, महसूल व ग्रामविकास विभागाच्या संयुक्त पथकांद्वारे अंतीम अहवाल तयार करण्यात आला. यंत्रणेला सध्या पावसाची मोजदाद, आवश्यक तेथे आपत्ती व्यवस्थापन आणि झालेल्या नुकसानीचे पंचनामे याच कामांना प्राथमिकता द्यावी लागत आहे. ६ एप्रिल रोजी अमरावतीत अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यानंतर ९ एप्रिल, १८ एप्रिल, १९ एप्रिल, २४ एप्रिल, २५ एप्रिल, २७ एप्रिल, २९ एप्रिल आणि ३० एप्रिलला पाऊस कोसळला. एप्रिल महिन्यात तब्बल नऊ दिवस पावसाने हजेरी लावली. या प्रत्येक दिवशी काही भागात पडझड झाली. तर काही भागात पिकांना पावसाचा फटका बसला.