नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) अद्ययावत ८० खाटांचे ‘पेईंग वार्ड’ मंजूर झाले आहे. हा प्रकल्प झाल्यावर येथे रुग्णांना अतिरिक्त पैसे मोजून खासगी रुग्णालयाच्या धर्तीवर चांगल्या सोयी मिळणे शक्य होईल. या अतिरिक्त पैशाबाबतचा प्रस्तावही लवकरच प्रशासनाकडून दिला जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेडिकलमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांसह अद्ययावत यंत्र असल्याने येथे उपचार घेण्याचा रुग्णांचा आग्रह असतो. परंतु, रुग्णांच्या तुलनेत चतुर्थ श्रेणीपासून परिचारिका आणि विविध तपासणी यंत्राची सोय कमी पडत असल्याने सध्याच्या यंत्रणेवर अतिरिक्त ताण येतो. मेडिकलमध्ये सध्या २० ‘पेईंग वार्ड’ असून अतिरिक्त पैसे मोजून येथे रुग्णांना उपचारासाठी थांबण्याची सोय आहे. हे ‘पेईंग वार्ड’ नेहमीच हाऊसफुल्ल असतात.

हेही वाचा >>>नागपुरातील आंतरराज्यीय बसस्थानक हलवण्याची मागणी का केली जात आहे?

हेही वाचा >>>वर्धा: टोमॅटोची उधारी मागितली म्हणून चाकूने भोसकले

मेडिकल प्रशासनाने मेडिकलमध्ये अतिरिक्त ८० खाटांचा प्रस्ताव शासनाला दिला होता. त्याला मंजुरी मिळाली असून हा प्रकल्प झाल्यावर येथे रुग्णांसाठी विविध तपासणीसह इतरही अद्ययावत सोयी उपलब्ध करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी रुग्णांना थोडे अतिरिक्त शुल्कही मोजावे लागणार आहे. या नावीन्यपूर्ण योजनेसाठी मेडिकल प्रशासनाला रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेण्यासाठी शासनाची परवानगी लागणार आहे.

”या प्रकाल्पला शासनाची मंजुरी मिळाली असून लवकरच या प्रकल्पाचे काम सुरू होईल. ‘पेईंग वार्ड मुळे रुग्णांना येथे खासगीप्रमाणेच सेवा मिळू शकेल.”- डॉ. राज गजभिये, अधिष्ठाता, मेडिकल रुग्णालय, नागपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Up to date 80 bed paying ward in medical hospital in nagpur mnb 82 amy