नागपूर : केंद्रीय लोकसेवा आयोगाने सुधारित वार्षिक वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार एनडीए, एनए १ भरती परीक्षेसाठी अधिसूचना येत्या आठवड्यात प्रसिद्ध केली जाणार आहे. ही अधिसूचना अधिकृत वेबसाइट https://upsc.gov.in/ exams/exam-calendar वर प्रसिद्ध केली जाईल. परीक्षेत बसलेले उमेदवार अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ते डाउनलोड करू शकतात. सुधारित वार्षिक कॅलेंडरनुसार राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमी परीक्षेची अधिकृत अधिसूचना ११ डिसेंबर २०२४ रोजी प्रसिद्ध केली जाईल. भरती परीक्षेसाठी अर्ज करण्याची विंडो ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत खुली राहील. यानंतर अर्जात दुरुस्ती करण्याची संधी दिली जाईल. ही परीक्षा १३ एप्रिल रोजी होणार आहे. दरवर्षी एनडीए आणि एनए परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. सुधारित वार्षिक दिनदर्शिकेनुसार एनएडी आणि एनए (दोन) परीक्षा १४ सप्टेंबर २०२५ रोजी घेतली जाईल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा