नागपूर: राज्यात सर्वत्र उन्हाचा कहर वाढल्याने पंखा, फ्रीज, वातानुकुलीत यंत्रासह इतरही विद्युत उपकरणांचा वापर वाढला आहे. या काळात आपल्याला भरमसाठ वीज देयक आल्यास कोणत्या यंत्राचा किती तास वापर झाला, याचा अंदाज लावता येणार आहे.
एप्रिल, मे, जुन व जुलै महिन्याचे वीज देयक बघून अनेकांच्या भुवया उंचावतात. देयक अवास्तव असल्याचे वाटते. काही प्रकरणात कर्मचाऱ्याच्या दोषामुळे, चुकीच्या मीटर वाचनामुळे किवा मीटरमधील तांत्रिक दोषामुळेही ते घडते. परंतु हा वापर योग्य की अवास्तव हे तपासण्यासाठी आपल्याकडील विजेची उपकरणे त्याचा वॅट व त्याचा दैनंदिन वापर याची माहिती घेऊन अंदाज बांधता येतो. हे वीज देयक जाणून घेण्यासाठी अनेक संकेतस्थळे व ॲप आहेत.
हेही वाचा…गंभीर धोक्यातील माळढोकसाठी आशेचा किरण…. जैसलमेरच्या प्रजनन केंद्रात….
त्यावर घरात असणारी उपकरणे, त्याचा असलेला वॅट व संख्या आणि उपकरणाचा दिवसातील वापराचे तास टाकल्यास महिन्याला होणारा एकूण वीज वापर व अंदाजित देयकाची माहिती कळते. वीजदेयकाच्या मागे वर्गवारीनिहाय वीज देयकाचे प्रति युनिट दर छापलेले असतात. त्यामध्ये ० ते १००, १०१ ते ३००, ३०१ ते ५००, ५०१ ते १०००, १००१ ते अधिक युनिट वीजवापरासंदर्भातील दरांचा समावेश आहे. एखाद्या महिन्यात जास्त वीज वापरल्यास त्याचे दरही त्या तुलनेत वाढतात. आयएसआय प्रमाणित तारांचा तसेच स्टार लेबल असलेल्या उपकरणांचा वापर केल्यास वीज वाचते.
आपल्याला उपकरणांचे वॅट, त्याचा दैनंदिन वापर याची माहिती जाणूनही वीज देयकाचे नियोजन करणे शक्य आहे. त्यातूनही विजेचा अवास्तव वापर टाळून देयक कमी करता येतो. १ हजार वॅटचे उपकरणाचा जर एक तास वापर केला तर १ युनिट साधारणतः वीज खर्च होते.
हेही वाचा…‘पक्षाला ओहोटी, काँग्रेसमध्ये सोनिया व राहुल गांधीच राहणार….’
प्रकार वीज वापर (वॅट्स) एक युनिटसाठी लागणारा वेळ
बल्ब २४/४०/६०/१०० ४०/२५/१६/१० तास
पंखा- ३६ इंच ६० १६ तास ४० मिनीट
पंखा- ४२ इंची ८० १२ तास ३० मिनीट
टेबल फॅन ४० २५ तास
मिक्सर, ज्युसर ४५० २ तास १३ मिनीट
इलेक्ट्रिक ओव्हन १२०० ५० मिनीट
इस्त्री – कमी वजन १००० ६० मिनीट
इस्त्री जास्त वजन २००० ३० मिनिट
टीव्ही १५ ६६ तास ४० मिनिट
वॉशिंग मशीन स्वयंचलित २००० ३० मिनीट
सेमी स्वयंचलित ४०० २ तास ३० मिनीट
व्हॅक्यूम क्लिनर ९५० १ तास
संगणक २५० ४ तास
वॉटर प्युरिफायर २५ ४० दिवस