नागपूर : गोमूत्र हे आहार द्रव्य नाही. त्यामुळे गोमूत्राचा औषध म्हणून उपयोग केला गेला पाहिजे. मात्र प्रक्रिया न करता गोमूत्र वापरू नये. तसे केल्यास ते आरोग्याला अपायकारक ठरते, अशी माहिती आयुर्वेद तज्ज्ञ आणि गोमूत्रावर गेल्या अनेक वर्षांपासून शंशोधन करणाऱ्या डॉ. नंदिनी भोजराज यांनी दिली.

डॉ. नंदिनी भोजराज यांनी लोकसत्ताला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्या म्हणाल्या, गोमूत्रावर अनेक ठिकाणी संशोधन सुरू आहे. त्यातून वेगवेगळे निष्कर्ष बाहेर येत आहेत. गोमूत्रावर होत असलेल्या अनेक औषधांना स्वामित्व अधिकारही मिळाले आहेत. मुळात गोमूत्र आहार द्रव्य नाही तर औषधी द्रव्य आहे. कुठलेही औषध आपण आपल्या मनाने घेत नाही. तसेच गोमूत्राचे आहे. गोमूत्रावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया केल्यानंतर त्याचा औषध म्हणून उपयोग केला पाहिजे. प्रत्येक गायीचे मूत्र वा दूध चांगले असेल असे नाही. गायीचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले नसेल तर औषधीयुक्त गोमूत्र मिळत नाही आणि असे गोमूत्र कुणी प्राशन केले तर ते आरोग्याला अपायकारक ठरते. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार गोमूत्र सेवन करायला हवे.

Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
mallikarjun kharge criticize pm narendra modi in nagpur
पंतप्रधान देशाचे असतात, पण मोदी मात्र सर्व चांगले प्रकल्प आपल्याच गृहराज्यात…खरगेंची जोरदार टीका
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

हेही वाचा – नागपूर : …अन चोरांनी चक्क मलवाहिनीवरील झाकण चोरून नेले

इंटरनॅशनल जर्नल ऑफ रिसर्चनुसार, गोमूत्रात सोडियम, लोह, मॅगनीज, क्लोरीन, सिलिकॉन, मॅग्नेशियम, टार्टरिक एसिड, कॅल्शियम, जीवनसत्त्वे (ए, बी, सी, डी, ई), दुग्धशर्करा, खनिजे, नायट्रोजन आणि क्रिएटिनिन असतात. त्यामुळे गोमूत्र औषध असले तरी ते प्रक्रिया केल्यानंतर डॉक्टराच्या सल्ल्यानुसार घेतले पाहिजे. उर्ध्वपातन प्रक्रियेने मिळणारे गोमूत्र अर्क लोकप्रिय झाले आहे. गोमूत्र अर्क पारदर्शक द्रव्य असून मूळ गोमूत्रापेक्षा गोअर्क हे आपल्या शरीरातील प्रतिजैविक यंत्रणेला चालना देत असल्याचेही डॉ. नंदिनी भोजराज यांनी सांगितले.

हेही वाचा – नागपूर : आधी पंतप्रधान मोदींविरुद्ध आक्षेपार्ह विधान; आता ‘या’ प्रकरणात काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाला अटक

शेतीच्या विकासासाठी उपयोग

काही शेतकरी गोमूत्राचा वापर करतात. शेतातील टाकाऊ पदार्थ (गव्हाचा भुसा, पऱ्हाटीची धसकटे, ज्वारीचे धांडे) तसेच तुऱ्यावरील तणे आणि अन्य झाडे (लॅन्टाना, रानटी झुडपे) यापासून कंपोस्ट खत तयार करण्यासाठी गोमूत्राचा उपयोग होतो. जुने गोमूत्र जास्त परिणामकारक ठरते. ताजे गोमूत्र फवारल्यास पानांना इजा होते आणि रोपटी कोमेजतात किंवा पाने गळतात. गोमूत्रात ७०-८० टक्के पाणी असले तरी फॉस्फेट ऑफ युरिया, म्युरेट ऑफ पोटॅश, काबरेनेट आणि पोटॅश अमोनिया, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, गंधक, तांबे, लोह, काबरेलिक आम्ल, हिपुरिक आम्ल, लॅक्टोस आणि महत्त्वाची संप्रेरके असतात. ही रसायने झाडांच्या वाढीसाठी पूरक ठरतात, असेही डॉ. नंदिनी भोजराज यांनी सांगितले.