लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

चंद्रपूर : जिल्ह्यात एकूण १९३ कारखाने आहेत. या कारखान्यांत अतिधोकादायक ते सर्वसाधारण रसायने वापरली जातात. यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. औद्योगिक आस्थापनांनी सुरक्षात्मक उपाययोजनांची अमंलबजावणी करून काळजी घेणे आवश्यक आहे. नागपूर, वर्धा व भंडारा येथे आयुध निर्माणी आणि स्फोटके बनवणाऱ्या खासगी कंपनीत तसेच गॅस कंपनीत गेल्या काही महिन्यांत अपघाताच्या घटना घडल्या. यात अनेकांना जीव गमवावा लागला, तर बहुसंख्य कामगार जखमी झाले. त्यानंतर अतिधोकादायक व सर्वसाधारण रसायने वापरणाऱ्या उद्योगांची बैठक बोलावण्यात आली.

जिल्ह्यात आजमितीस १९३ औद्योगिक कारखान्यांत रसायने वापरली जात आहेत. ही सर्व रसायने धोकादायक आहेत. यामुळे औद्योगिक अस्थापनांनी सुरक्षेची काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी दिले आहेत.

आणखी वाचा-अमरावती : अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची हत्या

औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयामार्फत, अरिष्ट समूहाची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला औद्योगिक सुरक्षा व आरोग्य उपसंचालक शरद धनविजय, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेंद्र सुरवाडे तसेच जिल्ह्यातील विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यातील कारखान्यांमध्ये कोणकोणती धोकादायक रसायने वापरली जातात, याबाबतच्या माहितीसह रसायनांची यादी तयार करावी. उद्योगांनी त्यांच्याकडे असलेल्या सुरक्षा साहित्यांची माहिती घ्यावी. मनुष्यहानी व इतर हानी टाळण्यासाठी उद्योगांनी सुरक्षाविषयक साहित्याचा आढावा घ्यावा व सुरक्षा नियमावलीचे पालन करावे. कारखान्यांमध्ये अनुचित दुर्घटना घडू नये, याबाबत दक्षता घ्यावी व नियमित पाठपुरावा करावा. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी संबंधित यंत्रणाची संपर्कप्रणाली अद्ययावत ठेवावी. तसेच अग्निरोधक व्यवस्था, सुरक्षेसाठी वापरले जाणारे कालबाह्य साहित्य मुदतीपूर्वी बदलवून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी गौडा यांनी दिल्या.

आणखी वाचा-अमरावती : तुरीचे दर दहा हजाराच्‍या पार

सुरक्षा नियमांचे उल्लंघन

जिल्ह्यातील सर्व कारखान्यांत दुर्घटना होऊ नये या दृष्टीने सर्वतोपरी काळजी घेण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले असले तरी बहुसंख्य कारखान्यांमध्ये नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले आहे. केवळ उद्योगच नाही तर चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र, वेकोलिच्या कोळसा खाणी, कोल वॉशरी तथा सिमेंट कारखाने आणि स्थानिक एमआयडीसीतील उद्योगांमध्येही सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप स्थानिक कामगार करत आहेत.